
कचरा प्रकल्पाच्या निधीची CBI-EDमार्फत चौकशी करा : सुप्रिया सुळे
पुणे : मागील काही दिवसात देशभरातील अनेक नेत्यांच्या सीबीआय आणि इडी मार्फत चौकशी करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेच्या कचरा प्रकल्पाच्या निधीची सीबीआय आणि इडीमार्फत चौकशी झाली पाहिजे अशी मागणी बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. (Investigate waste project funding through CBI-ED demand Supriya Sule)
पुणे शहरातील रामटेकडी येथील कचरा प्रकल्पाची खासदार सुप्रिया सुळे यांनी पाहणी केली. त्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

पुणे महानगर पालिकेच्यामाध्यमातून कचरा प्रकल्पासाठी कोट्यवधी रुपये देण्यात आले आहे. मात्र त्या पैशातून कोणत्याही प्रकाराच्या उपाय योजना करण्यात आल्या नाही. त्यामुळे हा निधी गेला कुठं, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर सीबीआय आणि इडी मार्फत चौकशी झाली पाहिजे. अशी मागणी बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.