
चाकण येथील औद्योगिक वसाहतीच्या पाचव्या टप्प्यात सहा बहुराष्ट्रीय कंपन्यांशी शासनाने सामंजस्य करार केले आहेत. येत्या वर्षभरात विविध कंपन्यांची पन्नास हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे, अशी माहिती एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी अविनाश हदगल यांनी दिली.
चाकण - येथील औद्योगिक वसाहतीच्या पाचव्या टप्प्यात सहा बहुराष्ट्रीय कंपन्यांशी शासनाने सामंजस्य करार केले आहेत. येत्या वर्षभरात विविध कंपन्यांची पन्नास हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे, अशी माहिती एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी अविनाश हदगल यांनी दिली.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पाचव्या टप्प्यासाठी जमिनीचे संपादन एमआयडीसीने केले आहे. त्याचा मोबदला बहुतांश शेतकऱ्यांना दिला आहे. सुमारे ६३७ हेक्टरवर पाचवा टप्पा होत आहे. त्यामुळे पंचवीस हजारावर लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. पाचव्या टप्प्यात चाकण, वाकीखुर्द, आंबेठाण, रोहकल, गोनवडी, बिरदवडी या गावातील जमिनींचे संपादन केले आहे. सुमारे दोनशे कोटी मोबदल्याचे वाटप करण्यात आले आहे. काही प्रकरणे न्यायालयात गेल्याने त्या शेतकऱ्यांना मोबदल्याचे वाटप केले नाही, असे खेडचे प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण यांनी सांगितले.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
नव्या वर्षीची मोठी गुंतवणूक
एमआयडीसीने जमिनीचे संपादन केल्यानंतर हजारो कोटींची गुंतवणूक येत्या वर्षभरात होणार आहे. यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात पैसा खळखळणार आहे. वर्षभरात कंपन्यांची कामे सुरू होतील, असे चित्र आहे.
Edited By - Prashant Patil