
iPhone 17 Launch
Sakal
पुणे : ॲपल या कंपनीचा ‘आयफोन १७’ या मालिकेतील मोबाईल शुक्रवारपासून भारतात सर्वत्र उपलब्ध झाला आहे. या मॉडेलविषयी प्रचंड उत्सुकता असल्याने पहिल्याच दिवशी त्याच्या खरेदीसाठी भारतातील ‘ॲपल’च्या अधिकृत स्टोअरबाहेर झुंबड उडाली होती. पुण्यातही कोरेगाव पार्कमधील कोपा मॉलमधील ॲपलच्या पहिल्या अधिकृत स्टोअरबाहेर ग्राहकांची तुफान गर्दी झाली होती. सकाळी सहापासून नागरिकांच्या रांगा पाहायला मिळाल्या.