
पुण्यातील उद्योजक प्रफुल्ल सारडा यांनी माहिती अधिकार (RTI) अंतर्गत आयआरसीटीसीकडे मागविलेल्या माहितीमुळे एक धक्कादायक बाब समोर आली आहे. भारतीय रेल्वेची ऑनलाइन तिकीट बुकिंग सेवा देणारी संस्था आयआरसीटीसीने गेल्या तीन आर्थिक वर्षांत (2022-23 ते 2024-25) तब्बल 2,619 कोटी रुपये ‘कन्व्हिनियन्स फी’च्या नावाखाली प्रवाशांकडून वसूल केले आहेत. ही रक्कम संकेतस्थळाच्या देखभालीसाठी, मेंटेनन्ससाठी आणि कार्यप्रणालीसाठी आकारली जात असल्याचा दावा आयआरसीटीसीने केला आहे.
मात्र, याबाबत पारदर्शकतेचा अभाव आणि तिकीट रद्द केल्यानंतरही ही फी परत न मिळणे यामुळे प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे.