खडकवासला धरणाच्या पडलेल्या धोकादायक संरक्षक भिंतीकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

khad.jpg
khad.jpg
Updated on: 

किरकटवाडी : पुणे-पानशेत रस्त्याला लागून असलेला खडकवासला धरणाच्या संरक्षक भिंतीचा काही भाग मागील वर्षभरापासून पडलेला असल्याने त्या ठिकाणी रस्ता खचत चालल्याने मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झालेली आहे. मात्र असे असताना वारंवार पाठपुरावा करूनही पाटबंधारे विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे. याबाबत वर्षभरापूर्वी दैनिक 'सकाळ' मधून वृत्तही प्रसारित करण्यात आले होते.

खडकवासला धरणाच्या संरक्षक भिंतीचा वीस ते तीस फूट लांबीचा भाग मागील वर्षभरापेक्षा जास्त कालावधीपासून पडलेला आहे. ज्या ठिकाणी भिंत पडलेली आहे तेथील रस्त्याचा मोठा बागही खचत चालला असून रस्त्याला मोठमोठे तडे गेल्याचे दिसून येत आहे. सध्या जोरदार पावसाला सुरुवात झालेली असल्याने भेगांमध्ये पाणी शिरल्यास रस्त्याचा भाग कोसळून मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. रात्री-अपरात्री असा अपघात झाल्यास यामध्ये वाहन चालक अंदाज न आल्याने थेट धरणामध्ये जाऊन एखाद्याचा जीव जाऊ शकतो.

सध्या धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू झाल्याने धरणातील पाणीसाठाही वेगाने वाढत आहे. रस्त्यावरील वाहतूकही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ज्या ठिकाणी भिंत पडलेली आहे तेथे माहितीसाठी कसलाही बोर्ड लावलेला नाही किंवा संरक्षक पट्टीही बांधलेली नाही. रस्ता खचलेल्या ठिकाणावरुन अवजड वाहन गेल्यास संपूर्ण भाग कोसळू शकतो. त्यामुळे पडलेल्या संरक्षक भिंतीची तातडीने दुरुस्ती करून घेणे आवश्यक बनले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

"ज्या ठिकाणी भिंत पडली आहे त्या ठिकाणाची तातडीने पाहणी करून दुरुस्तीसाठी इस्टीमेट तयार करून मंजुरीसाठी पाठवले जाईल. मंजुरी मिळाल्यानंतर प्राधान्याने संरक्षक भिंतीचे काम करून घेतले जाईल.-वामन भालेराव, उपअभियंता, पाटबंधारे विभाग

(Edited by : Sagar Diliprao Shelar)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Alandi Indrayani River Pollution Sparks Concern Before Kartiki Wari With Sewage And Dead Fish In The River
MPSC Students Protest in Pune Leaders Extend Support as Students Differ Over Objective and Descriptive Exam Pattern
Sharad Pawar
Pune Student Protest: Abhijit Dipke Raises Questions Over Students’ Future
Marathi News Esakal
www.esakal.com