industrial labour
sakal
खेड शिवापूर - गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर खेड शिवापूर परिसरातील अनेक उद्योग कंपन्यांतील कामगारवर्ग मोठ्या संख्येने आपापल्या गावी गेला आहे. त्याचा मोठा फटका या भागातील अनेक लहान-मोठ्या उद्योग व्यावसायिकांना बसतो आहे. कामगारवर्गाशिवाय उद्योग व्यवसाय चालविणे ही उद्योग व्यावसायिकांसाठी मोठी कसरत ठरत आहे. कोणी कामगार देता का कामगार, असे म्हणण्याची वेळ अनेक उद्योग व्यावसायिकांवर आली आहे.