RSSचं हॉस्पिटल फक्त हिंदुंसाठीच आहे का? टाटांच्या प्रश्नावर गडकरींनी दिलं होतं उत्तर

पुण्यात सिंहगड रोड परिसरातील एका रुग्णालयाचं उद्घाटनं आज गडकरींच्या हस्ते पार पडलं यावेळी त्यांनी हा किस्सा सांगितला.
Ratan Tata_Nitin Gadkari
Ratan Tata_Nitin Gadkari
Updated on

पुण्यात सिंहगड रोड परिसरातील एका धर्मादायी रुग्णालयाचं उद्घाटनं गुरुवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडलं, यावेळी त्यांनी एक जुना किस्सा कथन केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं (RSS) हॉस्पिटल फक्त हिंदुंसाठीच आहे का? असा प्रश्न रतन टाटांनी आपल्याला केला होता. त्यावर त्यांना गडकरींनी उत्तरही दिलं होतं. (Is RSS hospital for Hindus only Gadkari had given a answer to Ratan Tata question)

Ratan Tata_Nitin Gadkari
Image Gallary : प्रज्ञासूर्याचं 'या' ठिकाणी पार पडलंय शिक्षण!

आजच्या कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले, जेव्हा मी महाराष्ट्र शिवसेना-भाजपच्या तत्कालीन सरकारमध्ये मंत्री होतो तेव्हा एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यानं मला विनंती केली की, आपल्या रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी रतन टाटांना घेऊन याल का? यावर मी रतन टाटांना मी विचारणा केल्यानंतर त्यांनी मला विचारलं की, हे हॉस्पिटल फक्त हिंदूंसाठीच आहे का? यावर मी त्यांना विचारलं की तुम्हाला असं का वाटतंय? माझ्या या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिलं की, "हे आरएसएसचं हॉस्पिटलं आहे ना?" यावर मी त्यांना सांगितलं की, हे सर्व समाजासाठी आहे. आरएसएसमध्ये धर्मावर आधारित अशा प्रकारचा भेदभाव चालत नाही.

Ratan Tata_Nitin Gadkari
संचालक मंडळ नको, 'ट्विटर'च हवं; मस्क यांची नवी ऑफर

यावेळी चर्चेदरम्यान मी त्यांना अनेक गोष्टी समजावून सांगितल्या त्यानंतर त्यांनी आनंद व्यक्त केला, असंही यावेळी गडकरी यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com