
संचालक मंडळ नको, 'ट्विटर'च हवं; मस्क यांची नवी ऑफर
वॉशिंग्टन : जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे सीईओ अॅलन मस्क हे सोशल मीडियावरही राज्य करण्याच्या प्रयत्नात आहेत. यासाठी त्यांनी सर्वात मोठी मायक्रोब्लॉगिंग कंपनी ट्विटरला विकत घेण्याची ऑफर दिली आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं ही माहिती दिली आहे. (Alan Musk will now buy Twitter after being denied a seat on the board)
रॉयटर्सच्या माहितीनुसार, अॅलन मस्क यांनी ट्विटरला विकत घेण्याचा मानस व्यक्त केला आहे. यासाठी त्यांनी ४१ बिलियन डॉलरची ऑफरही दिली आहे. ट्विटरच्या संचालक मंडळातील जागा नाकारल्यानंतर काही दिवसांनंतर त्यांनी आता ट्विटर विकत घेण्याचा मानस व्यक्त केला आहे.
हेही वाचा: जेम्स लेनच्या पुस्तकावर बंदीसाठी पुरंदरेंनी लिहिलं होतं पत्र; मनसेनं आणलं समोर
दरम्यान, मस्क यांनी ४ एप्रिल रोजी मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरमध्ये (twitter) 9.2 टक्के हिस्सा विकत घेतला. यूएस एसईसी (Securities and Exchange Commission) फाइलिंगमध्ये ही माहिती देण्यात आली होती. द इकॉनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार, या माहितीनंतर ट्विटरच्या शेअर्स किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. Twitter Inc. ने त्यांच्या फाइलिंगमध्ये म्हटलं होतं की, अॅलन मस्क यांच्याकडे 73,486,938 इतके कॉमन स्टॉक आहेत. या अपडेटनं Twitter Inc चे शेअर्स 25.8 टक्क्यांनी वाढून 49.48 डॉलर प्री-मार्केट ट्रेडवर पोहोचलं होतं.
हेही वाचा: समीर वानखेडेंकडून आंबेडकरांना अभिवादन; नवाब मलिकांवर भाष्य करणं टाळलं
यानंतर दोनच दिवसांनंतर मस्क यांनी ट्विटरच्या संचालक मंडळात सामिल होण्यास नकार दिला होता. ट्विटरचे सीईओचे पराग अग्रवाल यांनी ही माहिती दिली होती. अग्रवाल यांनी ट्विटद्वारे सांगितलं होतं की, ट्विटरचे सर्वात मोठे शेअरधारक असल्यानं आम्ही त्यांना ट्विटरच्या संचालक मंडळात एक जागा उपलब्ध करुन दिली होती. याबाबत त्यांच्याशी अनेकदा चर्चाही झाली, पण त्यांनी हा प्रस्ताव नाकारला. ते आमचे सर्वात मोठे शेअरधारक असल्यानं त्यांच्या निर्णय आम्ही खुल्या मनानं स्वागत करतो.
Web Title: Elon Musk Will Now Buy Twitter After Being Denied A Seat On The Board
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..