Pune : लष्कराच्या गोपनीय माहितीसाठी आयएसआयचे प्रयत्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

honey trap 4.jpg

लष्कराच्या गोपनीय माहितीसाठी आयएसआयचे प्रयत्न

पुणे : देशाची सुरक्षाविषयक गुपिते उघड करण्यासाठी लष्करातील जवानांना हनी ट्रॅपमध्ये अडवून त्यांच्याकडून माहिती काढून घेतली जात आहे. जवानांना अडकविण्यासाठी पैसे आणि फोन सेक्सचा वापर करण्यात येत आहे. असे अनेक प्रकार गेल्या काही महिन्यांत उघडकीस आले आहे. यापूर्वी देखील असे प्रकार उघडकीस आले आहेत. मात्र, आता त्याचे प्रमाण वाढत असून फसवणुकीची पद्धत अद्ययावत झाल्याचे दिसते.

देशात लष्करी गुप्तचर विभागामार्फत जानेवारी २०२१ ते आतापर्यंत सुमारे एक हजार अशा प्रकारच्या कारवाया करण्यात आल्या आहेत. जवान जाळ्यात अडकल्यानंतर त्यांच्याकडून आलेली माहिती आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या एजंटला पाठवली जाते. त्याचा वापर भारताविरोधात कटकारस्थान करण्यासाठी येत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अशी आहे मोडस ऑपरेंडी

भारतीय लष्कराच्या वेगवेगळ्या विभागात किंवा आस्थापनेत तैनात असलेल्या जवानांना फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायची. तेथे चॅट सुरू झाल्यानंतर जवानाचा फोन नंबर घ्यायचा. त्यानंतर व्हॉट्सअॅप चॅट करून मैत्री आणखी घनिष्ट करायची. हळूहळू जवानाला प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे. तसेच त्यांना पैशाचे देखील आमिष दाखवले जाते. पैसा आणि फोन सेक्सचा वापर करून जवानांना फसवण्याची मोडस या ट्रॅपमध्ये वापरली जाते.

हनी ट्रॅप म्हणजे काय?

मोहात पाडू शकणाऱ्या किंवा आकर्षक व्यक्तींचा वापर करून एखाद्याला जाळ्यात अडकवणे व विविध कारणांसाठी त्याचा वापर करून घेण्याच्या पद्धतीला ‘हनी ट्रॅप’ म्हणतात. सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात हनी ट्रॅपचं स्वरूप बदललं आहे. पूर्वी हनी ट्रॅप लावणारी व्यक्ती समोरच्या व्यक्तीला प्रत्यक्ष भेटत असे. आता मात्र फेसबुक, व्हॉट्सअॅपअशा वेगवेगळ्या माध्यमांतून सहज हेरले जाते व अनेकदा प्रत्यक्ष न भेटता ऑनलाइन फसवणूक केली जाते.

loading image
go to top