esakal | पुणे मेट्रोला ISO;  कामगारांची सुरक्षितता, आरोग्याकडे दिले लक्ष 

बोलून बातमी शोधा

 ISO Certified to Pune Metro attention paid to health Safety of workers}

महामेट्रो पर्यावरण संवर्धनासाठी पहिल्या दिवसापासून सजग आहे. झाडांचे पुनर्रोपण, नवीन झाडांची लागवड, सौर ऊर्जेचा वापर, बायोडायजेस्टर व ग्रीन बिल्डिंगच्या धर्तीवर स्टेशनची उभारणी होत आहे. शहरातील मेट्रो प्रकल्पावर सुमारे ६५०० प्रत्यक्ष कामगार महामेट्रोच्या विविध ठिकाणी काम करत आहेत.

पुणे मेट्रोला ISO;  कामगारांची सुरक्षितता, आरोग्याकडे दिले लक्ष 
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : शहर आणि पिंपरी चिंचवडमधील प्रकल्पाचे काम गुणवत्तापूर्ण केल्याबद्दल महामेट्रोला ‘आयएसओ ९००१ ः २०१५’ हे प्रमाणपत्र गुरुवारी मिळाले. या प्रमाणपत्रामुळे ‘महामेट्रो’ची गुणवत्ताप्रणाली अधोरेखित झाली आहे. ‘‘महामेट्रोच्या कामात अधिक सुसूत्रता आणि नियमितपणा आणण्यासाठी ‘आयएसओ’ प्रमाणपत्राचा निश्चित फायदा होणार आहे,’’ अशी प्रतिक्रिया महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी व्यक्त केली आहे.

पिंपरी चिंचवड ते स्वारगेट व वनाज ते रामवाडी या दोन मार्गांवर मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू आहे. सुमारे ३१ किलोमीटर मार्गांवर मेट्रो धावणार आहे. त्यात ६ किलोमीटर लांबीचा कृषी महाविद्यालय ते स्वारगेट हा भुयारी मार्ग आहे. सध्या पुणे मेट्रोचे काम सुमारे ५० टक्के पूर्ण झाले असून उर्वरित काम देखील वेगाने सुरू आहे. विविध स्तरांवर मेट्रोच्या कामाची गुणवत्ता नियमितपणे तपासली जाते. जागतिक दर्जाच्या प्रयोगशाळांमध्ये त्याचे परीक्षण केले जात आहे. महामेट्रोच्या गुणवत्ता नियंत्रक प्रणाली यामध्ये अधिक सुसूत्रता आणण्यासाठी महामेट्रोने आयएसओ प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता. त्यानुसार ते मिळाले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
 

महामेट्रो पर्यावरण संवर्धनासाठी पहिल्या दिवसापासून सजग आहे. झाडांचे पुनर्रोपण, नवीन झाडांची लागवड, सौर ऊर्जेचा वापर, बायोडायजेस्टर व ग्रीन बिल्डिंगच्या धर्तीवर स्टेशनची उभारणी होत आहे. शहरातील मेट्रो प्रकल्पावर सुमारे ६५०० प्रत्यक्ष कामगार महामेट्रोच्या विविध ठिकाणी काम करत आहेत. महामेट्रोचे सुरक्षा विभाग कामगारांची सुरक्षितता आणि आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी सतत कार्यरत असते. कामगारांना हेल्मेट, सुरक्षा जॅकेट, सेफ्टी बेल्ट इत्यादी आदी साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच लेबर कॅम्पमध्ये डॉक्टरांमार्फत नियमित कामगारांची तपासणी केली जाते.
 

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा