

ज्यू वसाहतवाद्यावर
आरोपपत्र दाखल
जेरुसलेम, ता. ६ (पीटीआय) : इस्राईलचा ताबा असलेल्या ‘वेस्ट बँक’मध्ये गेल्या वर्षी झालेल्या पॅलेस्टिनी नेत्याच्या हत्येप्रकरणी इस्राईलच्या सरकारी वकिलांनी गुरुवारी एका ज्यू वसाहतवाद्यावर आरोपपत्र दाखल केले. संबंधित आरोपपत्र जिल्हा न्यायालयात सादर करण्यात आले.
आरोपपत्रानुसार, वेस्ट बँकेच्या दक्षिण भागात राहणारा यिनोन लेव्ही याच्यावर जुलै २०२५ मध्ये पॅलेस्टिनी कार्यकर्ते औदाह हथालिन यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. लेवीविरुद्ध खुनाऐवजी निष्काळजीपणामुळे मनुष्यवध हा तुलनेने कमी शिक्षेची तरतूद असलेला गुन्हा दाखल करण्यात आला आहे; तसेच शस्त्रासह बेकायदा घुसखोरी आणि जाणीवपूर्वक मालमत्तेचे नुकसान केल्याचेही आरोप त्याच्यावर ठेवण्यात आले आहेत.
पॅलेस्टिनी नागरिकांवरील हिंसाचाराच्या प्रकरणांत इस्राईलकडून ज्यू वसाहतवाद्यांविरुद्ध आरोपपत्र दाखल होणे अत्यंत दुर्मीळ मानले जाते. इस्राईलच्या मानवाधिकार संघटना बीत्सेलेमच्या माहितीनुसार, ७ ऑक्टोबर २०२३ नंतर वेस्ट बँकमध्ये पॅलेस्टिनी नागरिकाच्या मृत्यूप्रकरणी इस्राईलच्या नागरिकाविरुद्ध आरोपपत्र दाखल होण्याची ही पहिलीच घटना आहे. या कालावधीत इस्राईलमधील वसाहतवादी आणि सैनिकांच्या कारवायांमध्ये वेस्ट बँकमध्ये १,१०० पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाल्याचा दावा मानवाधिकार संघटनेने केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.