आश्चर्य ! 'या' प्राण्याला ऑक्सिजनची गरजच नाही !

Israeli researchers say theyve found first animal to survive without oxygen
Israeli researchers say theyve found first animal to survive without oxygen

जेरुसलेम : जिवंत राहण्यासाठी सजीवांना ऑक्सिजनची आवश्यकता असते, या विज्ञानातील गृहीतकाला छेद देणारे संशोधन समोर आले आहे. जिवंत राहण्यासाठी लागणारी ऊर्जा निर्माण करण्यासाठी ऑक्सिजनची गरज नसलेल्या एका प्राण्याचा शोध घेण्यात शास्त्रज्ञांना यश मिळाले आहे.

हेनेगुया असे या परजीवी प्राण्याचे नाव असून, तो सालोमन माशांच्या स्नायूमध्ये आढळून येतो, असे संशोधकांनी म्हटले आहे. पीएनएएस नियतकालिकाच्या ताज्या अंकात हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आले आहे. या संशोधनाबाबत बोलताना इस्राईलमधील तेल अविव विद्यापीठातील प्रा. डोरोथी हुकून यांनी सांगितले, की हेनेगुया हा परजीवी प्राणी अतिशय लहान आकाराचा प्राणी आहे. दहाहूनही कमी पेशी असलेला हेनेगुया हा जेलीफिश आणि प्रवाळांशी साधर्म्य असलेला प्राणी आहे. जिवंत राहण्यासाठी आवश्यक असणारी ऊर्जा निर्माण करण्यासाठी तो ऑक्सिजनचा वापर करत नाही. श्वसनाच्या क्रियेत ऑक्सिजन न घेणारे प्राणी आहेत. मात्र, हेनेगुयाची श्वसनाची प्रक्रिया तशी नसल्याचे आम्हाला संशोधनात आढळून आले आहे.

आझम खान यांना न्यायालयाचा दणका! पत्नी आणि मुलासह तुरुंगात

उत्क्रांत होण्याची प्रक्रिया वेगळ्याच दिशने जात असल्याचे आम्हाला दिसून आले आहे. श्वसनाच्या प्रक्रियेतून मिळणारा ऑक्सिजन हा प्राण्यासाठी ऊर्जेचा मुख्य स्रोत असतो. मात्र हेनेगुयामध्ये ही प्रक्रिया आढळून येत नाही.

इंदूरीकरांच्या किर्तनाला गेल्या अन्...

काही बुरशी आणि अमिबासारख्या सजीवांनी कालांतराने श्वसनप्रक्रियेचा त्याग केला आहे. नव्या संशोधनात हीच बाब प्राण्यांमध्येही आढळून आली आहे. काही परजीवी प्राण्यांमध्ये अशाच प्रकारची रचना दिसून आली असून, अपघातानेच ती निर्माण झाली आहे, असे संशोधकांचे म्हणणे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com