

ISRO's space launch countdown begins with EOS-05 on September 4.
Sakal
पुणे : भारतीय अवकाश संशोधन संस्थेतर्फे (इस्रो) भूस्थिर उपग्रह प्रक्षेपकाला (जीएसएलव्ही एफ १७) श्रीहरिकोटाच्या दुसऱ्या लाँच पॅडवर हलवण्यात आले असून, आठ महिन्यांच्या शांततेनंतर ‘इस्रो’ची अवकाश प्रक्षेपणे लवकरच सुरू होण्याची अपेक्षा आहे. येत्या चार सप्टेंबरला ‘ईओएस ०५’ या भूस्थिर कक्षेतून दूरसंवेदन (रिमोट सेन्सिंग) करणाऱ्या देशातील पहिल्या उपग्रहाचे प्रक्षेपण नियोजित आहे.