

ISRO telemedicine network India
sakal
पुणे : देशाच्या अतिदुर्गम सीमांवर तैनात असलेल्या जवानांना आता एका क्लिकवर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला मिळणे शक्य होणार आहे. ‘सशस्त्र सेना वैद्यकीय सेवे’ने (एएफएमएस) डिजिटल क्रांतीचा स्वीकार करत, ‘आयुष्मान भारत डिजिटल मिशन’ची अंमलबजावणी सुरू केली आहे. ‘भारतीय अंतराळ संशोधन संस्थे’च्या (इस्रो) उपग्रह तंत्रज्ञानाद्वारे टेलिमेडिसिन नेटवर्कचा विस्तार केला जात आहे. यामुळे वाळवंट असो वा हिमाच्छादित शिखरे, जवानांच्या आरोग्यासाठी आता भूगोल ही अडचण ठरणार नाही.