भाऊ रंगारी गणपतीचा रथ उधळला... पण अनर्थ टळला!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

उधळलेल्या बैलावर वेळीच नियंत्रण आणल्याने पुढील अनर्थ टळला. रथ नागरिकांच्या अंगावर जाता जाता राहिला. 

पुणे : लक्ष्मी रस्त्यावरील पु. ना. गाडगीळ ज्वेलर्ससमोर भाऊ रंगारी गणपतीच्या रथाचा बैल बिथरला. उधळलेल्या बैलावर वेळीच नियंत्रण आणल्याने पुढील अनर्थ टळला. रथ नागरिकांच्या अंगावर जाता जाता राहिला. 

Video : दगडुशेठ हलवाई गणपतीचा भक्तांना निरोप; पुढच्या वर्षी लवकर या!

परत काही वेळाने बैलाने उधळण्याचा प्रयत्न केल्याने भाविकांची पळापळ झाली. जवळपास 20 मिनिटे रथ जागेवर थांबून होता. त्यांनतर मिरवणूक सुरळीत पार पडली. पहाटे 5 वाजता श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळचा नगारा बेलबाग चौकात दाखल झाला तर 5.34 पर्यंत भाऊ रंगारी गणपती टिळक चौकात दाखल झाला होता. साधारण सातच्या दरम्यान भाऊ रंगारी गणपतीचे विसर्जन करण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: issue in Bhau rangari ganpati immersion rally