Coronavirus : लर्निंग लायसेन्स मिळणे पूर्ण बंद

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 17 March 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने कामकाजात काही बदल केले आहेत.

बारामती : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने कामकाजात काही बदल केले आहेत. बारामती मुख्यालय व शिबीर कार्यालयात देण्यात येणारा वाहन चालविण्याचा शिकाऊ परवाना पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

येत्या 31 मार्चपर्यंत हे कामकाज बंद असेल. याशिवाय ऑटो रिक्षा परवान्याबाबतचेही कामकाज बंद राहणार आहे. वाहन हस्त्तांतरण, वाहनांचे दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र तसेच वाहनांवरील बोजा उतरविणे यासाठी वाहनमालकाने समक्ष स्वाक्षरीसाठी येण्याची आवश्यकता नाही. तथापि त्याबाबतचे प्रतिज्ञापत्र विहीत नमुन्यात सादर करणे आवश्यक असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडे यांनी कळविले आहे.

तसेच ज्यांनी वाहन चालविण्याचा शिकाऊ परवाना काढून चार महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे, त्यांचेच वाहन चालविण्याच्या पक्का परवाना देण्याचे काम करण्यात येणार आहे. वाहनधारकांनी या बदलांची नोंद घेण्याचे आवाहन धायगुडे यांनी केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Issue of Learning Licence stopped in Baramati

Tags
टॉपिकस
Topic Tags: