जागा ताब्यात आल्याने प्रलंबित रस्त्याचा प्रश्न  सुटला : महापौर मोहोळ 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 28 September 2020

​आता  कंपनीच्या ताब्यातील जमीन महापालिकेच्या ताब्यात आली असून रस्त्याचे काम सुरू होत आहे. अंशी  माहिती  महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.   प्रत्यक्ष जागेची पाहणी करायला आले असताना महापौर मोहोळ यांनी ही माहिती दिली.  यावेळी नगरसेविका वासंती जाधव, हर्षाली माथवड, पथ विभागाचे प्रमुख व्ही. बी. कुलकर्णी, भूसंपादन अधिकारी जे. पी. पवार, महापालिका सहआयुक्त संदीप कदम, तसेच कमिन्स इंडिया कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.

कोथरूड :  कोथरूडमधील भेलकेनगर चौक ते आशिष गार्डन रस्त्यावरील  परांजपे हायस्कूल ते बधाई चौकापर्यंत जाणार्‍या रस्त्याचे काम अनेक वर्षापासून रखडले होते. कमिन्स इंडिया कंपनीच्या ताब्यातील काही जमीन पुणे महानगरपालिकेला देण्यासंदर्भात अनेक दिवसापासून सातत्याने प्रयत्न सुरू होते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महापौर मोहोळ म्हणाले की,  कमिन्स कंपनी मागील गांधी भवनकडे जाणारा रस्ताही आता मोठा होणार असून तिथेही जमीन ताब्यात घेण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण करत आहोत.  कमिन्स कंपनीकडील दहा हजार स्केअर फूट जागा महापालिकेच्या ताब्यात आल्याने अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या या रस्त्याचे काम आता होणार असून यामुळे परिसरातील नागरिकांना वाहतुकीच्या समस्येतून दिलासा मिळणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भेलके नगर ते एकलव्य काॅलेज रस्ता या विकास आराखड्यातील रस्त्यात सागर काॅलनीतील काही दुकाने, घरे, तसेच परांजपे विद्यालयालगत असलेल्या एका  जागेचा अडथळा आहे. त्या जागांचा ताबा घेण्याचे  काम सुरू असून लवकरच सकारात्मक निर्णय होतील अंशी आशा आहे.  ही  कामे पूर्ण झाल्यानंतर वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The issue of pending road has been resolved due to occupation of land said pune Mayor Mohol