कॅन्टोन्मेंटचे सरदार पटेल रुग्णालय अडकले लालफितीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cantonment Sardar Patel Hospital

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयातील ऑपरेशन विभाग सप्टेंबर 2020 मध्ये आगीत जळून खाक झाले होते.

कॅन्टोन्मेंटचे सरदार पटेल रुग्णालय अडकले लालफितीत

कॅन्टोन्मेंट - सर्वसामान्य रुग्णांना उत्तम उपचार मिळावेत, यासाठी सायबेज आशा ट्रस्ट व साबळे वाघिरे, पुणे रोटरी क्लब सारख्या ३५ सामाजिक संस्थांनी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयात सुसज्ज शस्त्रक्रिया विभाग उभारला. मात्र, कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या लालफितीच्या कारभारमुळे 1 जुलै 2022 रोजी उद्घाटन झालेले ऑपरेशन थिएटर बंद असल्याने रुग्णांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयातील ऑपरेशन विभाग सप्टेंबर 2020 मध्ये आगीत जळून खाक झाले होते. तेव्हापासून शस्त्रक्रिया विभाग बंद होता. त्यामुळे गरीब, गरजू रुग्णांना खासगी रुग्णालयात महागडे उपचार करून घ्यावे लागत होते. ही बाब सामाजिक संस्थांनी जाणून सायबेज आशा ट्रस्टने शस्त्रक्रिया (ऑपरेशन थेटर) पुनरुज्जीवित केले आहे. त्याचे उद्घाटनही मान्यवरांच्या हस्ते झाले. शस्त्रक्रिये दरम्यान, वीज पुरवठा खंडित झाल्यास रुग्णाला धोका निर्माण होऊ शकते. त्यामुळे अखंड वीजपुरवठा सुरु रहाण्यासाठी युपीएस तंत्रज्ञ असणे आवश्यक आहे. त्यासाठी सुमारे पंधरा लाख रुपये आवश्यक आहेत. निधी मागणीचा प्रस्ताव रुग्णालय प्रशासनाने कॅन्टोन्मेंटला सादर केला आहे. बोर्डाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली असून, आता बोर्डाच्या अध्यक्षांकडे प्रस्ताव आहे.

या संदर्भात रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. उषा तपासे म्हणाल्या की, ऑपरेशन थिएटरचे पूर्ण काम झाले. फक्त यूपीएसअभावी सुरू करता येत नाही. ऑपरेशन थिएटर सुरू नसल्याने रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी बाहेर पाठवावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

तसेच बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुब्रत पाल यांनी सांगितले की, यूपीएस करिता बोर्डाकडून मंजुरी देण्यात आली असून येत्या आठवड्यात हे काम पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन पाल यांनी दिले.

Web Title: Issues In Cantonment Sardar Patel Hospital

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :puneHospital