तळवडे आयटी कर्मचारी धास्तावले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

पिंपरी - रात्री घरी परतणाऱ्या तळवडे आयटी पार्कमधील नोकरदारांना लुटण्याचे प्रकार होत आहेत. यामुळे कर्मचारी धास्तावले असून, त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. 

मागील आठवड्यात तळवड्यातील कर्मचाऱ्यांना लुटण्याच्या तीन ते चार घटना घडल्या. चार ते पाच जण काठ्या घेऊन कर्मचाऱ्यांवर धावून गेले होते. मात्र, या कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवत स्वतःची सुटका करून घेतली. त्यानंतर संबंधित आयटी कंपनीच्या व्यवस्थापनाने पोलिसांत तक्रारही नोंदविल्याचे फोरम फॉर आयटी एम्प्लॉईज (फाइट)चे अध्यक्ष पवनजित माने यांनी सांगितले. 

या घटनांमुळे रात्रपाळी करणाऱ्या आयटी कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी कंपन्यांच्या व्यवस्थापनाने योग्य ती सुरक्षा व्यवस्था करावी. तसेच, सुरक्षा रक्षकांची सुविधा उपलब्ध करून द्यावी. आयटी कर्मचाऱ्यांना लुटणाऱ्यांना गजाआड करण्यासाठी पोलिसांनी तत्काळ पावले उचलावीत, अशी गरज माने यांनी बोलून दाखविली. 

आयटी पार्कमधील स्थिती काय ? 
तळवडे आयटी पार्कमध्ये दहा ते बारा आयटी कंपन्या कार्यरत आहेत. त्यामध्ये बहुराष्ट्रीय आयटी कंपन्यांचा समावेश आहे. येथील कर्मचाऱ्यांची संख्या २५ हजारांपर्यंत आहे. त्यामध्ये ३० ते ४० टक्‍के महिलांचा समावेश आहे. याचा विचार करता पोलिसांनी या परिसराच्या सुरक्षेकडे अधिक लक्ष देण्याची आवश्‍यकता आहे. नाइट पेट्रोलिंग, नाकाबंदीकडे पोलिसांनी सर्वाधिक भर द्यावा, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. पोलिस यंत्रणा आणि संबंधित कंपन्यांनी कर्मचाऱ्यांसाठी तत्काळ सुरक्षा योजना करण्याची आवश्‍यकता आहे.

सीसीटीव्ही यंत्रणा हवी....
आयटी पार्कच्या सुरक्षिततेसाठी या परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्याची आवश्‍यकता आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) ने यासंदर्भातील प्रस्ताव तयार करण्याची आवश्‍यकता आहे. आयटी पार्कचा परिसर सुरक्षित करण्यासाठी सर्वच यंत्रणांनी पुढाकार घेण्याची आवश्‍यकता असल्याचे फोरम फॉर आयटी एम्प्लॉइजकडून सांगण्यात आले. 

Web Title: IT Employee Loot Crime Danger