esakal | ‘आयटीयन्स’ नवीन वर्षातच करणार ऑफिसमध्ये ‘लॉगइन’ 
sakal

बोलून बातमी शोधा

IT employees will to join office in New Year.jpeg

कोरोना विषाणूंचा जगभरात उद्रेक झाला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून जग याचा मुकाबला करताना दिसते. या संसर्ग रोखण्याचा प्रभावी उपाय म्हणून एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवणे. ज्याला आता ‘सोशल डिस्टेंसिंग’ असा शब्द रुढ झालायं. अशा ‘सोशल डिस्टेंसिंग’ मोठ्या ‘आयटी’ कंपन्यांमध्ये मर्यादा आहेत. त्यामुळे घरातून काम करणे (वर्क फ्रॉम होम) हा पर्याय बहुतांश कंपन्यांनी स्वीकारलाय.

‘आयटीयन्स’ नवीन वर्षातच करणार ऑफिसमध्ये ‘लॉगइन’ 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : माहिती तंत्रज्ञान (आयटी) कंपनी किंवा उत्पादन कंपन्यांमधील सेल्ससारख्या विभागातील कर्मचाऱयांनो, तुम्ही आता नवीन वर्षातच ऑफिसमध्ये ‘लॉगइन’ कराल, अशी शक्यता निर्माण होत आहे. त्यामुळे पुढील 128 दिवस घरातूनच काम करण्याची मानसिक तयार करा. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोना विषाणूंचा जगभरात उद्रेक झाला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून जग याचा मुकाबला करताना दिसते. या संसर्ग रोखण्याचा प्रभावी उपाय म्हणून एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवणे. ज्याला आता ‘सोशल डिस्टेंसिंग’ असा शब्द रुढ झालायं. अशा ‘सोशल डिस्टेंसिंग’ मोठ्या ‘आयटी’ कंपन्यांमध्ये मर्यादा आहेत. त्यामुळे घरातून काम करणे (वर्क फ्रॉम होम) हा पर्याय बहुतांश कंपन्यांनी स्वीकारलाय.

कोरोनाचा पहिला रुग्ण पुण्यात 9 मार्चला आढळला. त्यानंतर रुग्णसंख्या वाढत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे मार्चअखेरपर्यंत बहुतांश कंपन्यांमधील कर्मचारी घरातून काम करत आहेत. प्रत्येक महिन्याला आढावा घेऊन पुढील महिन्याच्या कामाच्या पद्धतीची सूचना कर्मचाऱयांना दिली जाते. गेल्या पाच महिन्यांमध्ये दर महिन्याच्या अखेरीस घरातून काम करण्याची सूचना देणारी ई-मेल कर्मचाऱयांच्या इनबॉक्समध्ये येतात. पण, सध्या पुण्यात आढळणाऱया रुग्णांची संख्या, संसर्गाच्या फैलावाचा दर या आणि याच्याशी संबंधीत सर्व घटकांच्या माहितीची विश्लेशण करून पुढील महिन्याचा निर्णय कंपनी घेते.  

पुण्यात फिल्मीस्टाईल थरार; खूनाचा प्रयत्न करणाऱ्याचा पोलिसांनी केला पाठलाग आणि...

पुण्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या नियंत्रित आणण्याचे आटोकात प्रयत्न सुरू आहेत. पण, त्यानंतरही रोजच्या रुग्णांची संख्या काही शे ते हजारांमध्ये आहे. त्यामुळे आता डिसेंबरपर्यंत घरातून काम करण्याची मानसिक तयारी करा, अशी चर्चा कंपन्यांमध्ये सुरू झाली आहे.

मोठ्या माहिती तंत्रज्ञान कंपन्यांमधून ‘सोशल डिस्टेंसिंग’ पाळणे अवघड आहे. त्यामुळे सध्या 10 ते 20 टक्के कर्मचाऱयांनी आँफिसमध्ये येण्यास परवानगी दिली आहे. मात्र, उर्वरित 80 ते 90 टक्के कर्मचारी घरातूनच काम करत आहेत. चाकणसारख्या औद्योगिक केंद्रांमधील कंपन्यांमधूनही हाच सुर एकू येत आहे. तेथील  कर्मचाऱयांनाही पुढील किमान 128 दिवस आँफिसमध्ये लॉगइंन करता येणार नाही, अशी माहिती पुढे येत आहे. 

दर्जा! पुण्याच्या तरुणानं 22 हजार नाण्यांपासून बनवलं 200 किलोचं शिवलिंग

या बाबत माहिती तंत्रज्ञान कंपनीतील हर्षल म्हणाले, “दर महिन्याच्या शेवटी पुढील महिन्यातील कामाची माहिती देणारी मेल येते. त्यात या महिन्यात घरातूनच काम करावे, असा स्पष्ट उल्लेख असतो. अशा आतापर्यंत चार मेल आल्या आहेत.”

संदीप म्हणाले, “लस येईपर्यंत कंपन्या पूर्ववत सुरू होतील, असे वाटत नाही. कारण, एखादा कर्मचारी पॉझिटीव्ह आल्यास, त्याच्या संपर्कात येणाऱयांचा धोका वाढतो. असा धोका पत्करून काम करण्याची सध्या काहीच गरज नाही.”

loading image
go to top