death
sakal
पुणे - वेदनेपासून आराम मिळवण्यासाठी मानेखाली इलेक्ट्रिक हॉट वॉटर बॅग ठेवून आयटी अभियंता झोपी गेला. मात्र, त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याचे आढळून आले आहे. वडगाव शेरीत बिछान्यावर हा ३० वर्षीय अभियंता मृतावस्थेत आढळला असून झोपेतच मानेखालच्या इलेक्ट्रिक उपकरणातून विजेचा धक्का लागून त्याचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.