पिंपरी : ...म्हणून सॉफ्टवेअर इंजिनीअरने केली 5 व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

मेघा या संगणक अभियंता म्हणून हिंजवडीतील एका कंपनीत नोकरीला होत्या. त्यांचे संतोष यांच्याशी 2015 मध्ये लग्न झाले होते. या दाम्पत्याला तीन वर्षांचा मुलगा आहे. दरम्यान, फ्लॅट घेण्यासाठी माहेराहून 25 लाख रूपये आणण्याची मागणी सासरच्या मंडळी वारंवार मेघा यांच्याकडे करीत होत्या. पैसे न आणल्याने सासरचे मंडळी मेघा यांना शारीरिक व मानसिक त्रास देत.

पिंपरी : फ्लॅट घेण्यासाठी माहेराहून 25 लाख रूपये आणावेत यासाठी पती, सासू व सासऱ्याने आयटी अभियंता असलेल्या विवाहितेचा छळ केला. या छळाला कंटाळून विवाहितेने इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी डॉक्‍टर पतीला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना चिंचवड येथे घडली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

संतोष पाटील (वय 34, रा. पुष्पांगन अपार्टमेंट, माणिक कॉलनी, लिंक रोड, चिंचवड) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी मेघा यांचे वडील सुधाकर शंकर शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार डॉक्‍टर पती संतोष नामदेव पाटील (वय 37) याला पोलिसांनी अटक केली असून सासू सुजाता पाटील, नामदेव पाटील यांच्यावर गुन्हा दाखल आहे.

- पुण्याच्या बातम्यांसाठी येथे ► क्लिक करा

मेघा या संगणक अभियंता म्हणून हिंजवडीतील एका कंपनीत नोकरीला होत्या. त्यांचे संतोष यांच्याशी 2015 मध्ये लग्न झाले होते. या दाम्पत्याला तीन वर्षांचा मुलगा आहे. दरम्यान, फ्लॅट घेण्यासाठी माहेराहून 25 लाख रूपये आणण्याची मागणी सासरच्या मंडळी वारंवार मेघा यांच्याकडे करीत होत्या. पैसे न आणल्याने सासरचे मंडळी मेघा यांना शारीरिक व मानसिक त्रास देत.

पीएमपीच्या महिला वाहकाच्या प्रसंगावधानामुळे सर्व स्तरांतून होतेय कौतुक

शनिवारी (ता. 8) सायंकाळीही संतोष व मेघा यांच्यात वाद झाला. वारंवार होणाऱ्या या त्रासाला कंटाळून मेघा यांनी इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. चिंचवड पोलिस अधिक तपास करीत आहेत.

....म्हणून 'त्याने' बहिणीच्या पतीच्या डोक्यात कोयत्याने वार करून केला खून

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: IT engineer suicide by jumping from 5th floor of building in pimpri