Accident : पाषाण-सूस रस्त्यावर अपघातात आयटी अभियंता महिलेचा मृत्यू

दोन मोटारींच्या झालेल्या अपघातात एका आयटी अभियंता महिलेचा मृत्यू झाला. तर, अन्य एक तरुण गंभीर जखमी झाला आहे.
Accident
Accidentesakal

पुणे - दोन मोटारींच्या झालेल्या अपघातात एका आयटी अभियंता महिलेचा मृत्यू झाला. तर, अन्य एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना पाषाण-सूस रस्त्यावर वरदायिनी सोसायटीसमोर शनिवारी (ता. २४) रात्री घडली.

कीर्ती कृष्णा माळवे ऊर्फ केतकी विश्वास नागटिळक (वय ४०, रा. इस्टीका सोसायटी, बाणेर) असे मृत्युमुखी पडलेल्या अभियंता महिलेचे नाव आहे. याबाबत अभिक चॅटर्जी (वय २४, रा. पाषाण-सूस रस्ता) यांनी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून मोटारचालक महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चॅटर्जी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास मोटारीतून पाषाण-सूस रस्त्याने घरी निघाले होते. ते वळण घेत असताना त्यांच्या मोटारीला पाठीमागून माळवे यांच्या मोटारीने जोरात धडक दिली. या अपघातात माळवे स्वत: गंभीर जखमी झाल्या. त्यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर या अपघातात फिर्यादी चॅटर्जी हेही गंभीर जखमी झाले आहेत. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक श्यामल पाटील करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com