
Hinjewadi Accident
Sakal
हिंजवडी : आयटी नगरी माण-हिंजवडी परिसरात गर्दीच्या वेळेत बंदी असतानाही शिरकाव केलेल्या सिमेंट मिक्सरखाली सापडून दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (ता.१०) सकाळी अकराच्या सुमारास घडली. यामुळे आयटी परिसरातील खराब रस्ते आणि प्रामुख्याने बेदरकार चालविल्या जाणाऱ्या मिक्सर-डंपरसारख्या वाहनांचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे.