
ITI Admissions
Sakal
पुणे : राज्यातील शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये उपलब्ध प्रवेशाच्या राज्यातील एकूण जागांपैकी आतापर्यंत ८३.७० टक्के जागांवर, तर पुणे जिल्ह्यातील ७३.८० टक्के जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. राज्यातील १६.३० टक्के आणि पुणे जिल्ह्यातील २६.२० टक्के जागा अद्याप रिक्त आहेत. या रिक्त जागांवरील प्रवेशासाठी शनिवारपर्यंत (ता. २०) मुदतवाढ देण्यात आली आहे.