esakal | आयटीआयमध्ये शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा | औंध
sakal

बोलून बातमी शोधा

औंध :- शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्यास उपस्थित उमेदवार.

औंध : आयटीआयमध्ये शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औंध : केंद्र सरकारच्या शिकाऊ उमेदवारी विभागाकडून देश पातळीवर शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचे आयोजन करण्याबाबत सुचित करण्यात आले होते.त्यानुसार औंध येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या मेळाव्याकरिता आयटीसी, फियाट, भारत इलेक्ट्रॉनिक्स,टाटा फिकोसा,टाटा ऑटोकॉम,टाटा टोयो रेडीएटर्स यासारख्या तेवीस नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

हेही वाचा: Solapur : अंगावर विज पडुन शेतकऱ्याचा मृत्यु

या मेळाव्यात संबंधित प्रतिनिधींनी आपल्या कंपनीतील शिकावू उमेदवारीच्या रिक्त जागांकरिता उपस्थित उमेदवारांच्या मुलाखती घेऊन यातून त्यांची निवड केली. हा मेळावा यशस्वी करण्याकरिता व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण पुणे विभागाचे सहसंचालक यतीन पारगावकर,औंध आयटीआयचे प्राचार्य बी.आर.शिंपले,तसेच सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार (वरिष्ठ) विकास टेके यांचे मार्गदर्शन लाभले.उपप्राचार्य सुरेश भालचिम,सोनम चौधरी तसेच अप्रेंटीसशीप ॲडव्हायझर प्रतीक देशमुख व दीपक चौधरी यांच्या नियोजनाखाली व संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत हा मेळावा संपन्न झाला.

loading image
go to top