esakal | आला पावसाळा, आहार सांभाळा
sakal

बोलून बातमी शोधा

Food

आला पावसाळा, आहार सांभाळा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - पावसाळा (Rain) म्हटलं की प्रत्येकाला आठवण होते ती गरम-गरम भजी, कांदे-पोहे किंवा चटपटीत अन्‌ मसालेदार खाण्याची. (Food) मात्र, उन्हाळ्यानंतर पावसाळा आल्याने ऋतुबदलाप्रमाणे आपल्या शरीरातील हार्मोन्समध्येही बदल होत असतो. त्यातच सध्या कोरोनाची 9Corona) साथ सुरू असल्याने घराबाहेर पडून बाहेरचे पदार्थ खाणे टाळावे, असा सल्ला आहारतज्ज्ञांनी दिला आहे. (Its Raining Take Care of the Diet)

पावसाळ्यामध्ये प्रत्येकालाच मित्रमंडळींसह कुटुंबीयांसोबत गप्पा मारत चटपटीत पदार्थ चवीने खावेसे वाटतात. पण, चविष्ट लागणारे सर्वच पदार्थ आपल्या आरोग्यासाठी पोषक नसल्याचे आहारतज्ज्ञांनी सांगितले. त्यामुळे या काळात आहाराकडे लक्ष देणे अति महत्त्वाचे ठरते. या काळात बाहेरील अर्थात जंक फूड खाणे टाळावे. अत्यंत उष्ण व प्रकर्षाने अति शीत पदार्थ या ऋतूत हानिकारक असतात. आपला आहार संतुलित आणि रात्री झोपण्याची व सकाळी उठण्याची वेळ निश्चित असेल तर पावसाळ्यात आजारी पाडण्याचे प्रमाण कमी असते. ऋतुननूसार आहार बदल करणे गरजेचे आहे, असेही आहारतज्ज्ञांनी सांगितले.

हेही वाचा: पुण्याच्या मैथिलीची हार्वर्डमध्ये निवड

आहारतज्ज्ञ डॉ. प्रणिता अशोक म्हणाल्या, पाऊस व कोरोनामुळे अनेकजण घराबाहेर पडत नाही. त्यामुळे आहारही प्रमाणात व योग्य असणे गरजेचे आहे. आहारात काजू, अक्रोड, बदाम यांसारख्या स्निग्ध पदार्थांचा योग्य प्रमाणात समावेश असावा. तसेच, बाहेरचे व तेलकट पदार्थ टाळावेत. हंगामी फळ, सलाड, डाळी, कडधान्य भरपूर प्रमाणात खाव्या. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

आहारतज्ज्ञ मोहित देशपांडे म्हणाले, निसर्गात राहून निसर्गासोबत वैर चांगले नाही. फास्ट फूड, सॉफ्ट ड्रिंक, रसायनांचा वापर करून पिकवलेले पदार्थ खाऊ नयेत. या गोष्टींचा शरीरावर वाईट परिणाम होतो. पावसाळ्यामध्ये प्राणायाम व ओंकारसाधना करणे चांगले असते. ऋतुबदलाच्या काळात थोडी काळजी घेणे व अनुकूल आहार असणे गरजेचे आहे.

हेही वाचा: मनसेचे गतवैभव परत आणायचं; राज ठाकरे यांचे आदेश

आहारात कोणते बदल करावेत...

 • कोमट किंवा उकळलेले पाणी थंड करून प्यावे.

 • आहारात कडधान्य व डाळींचा समावेश करावा.

 • बदाम, अक्रोड, काजू, खजूर, सुके अंजीर, मनुके योग्य प्रमाणात खावे.

 • हंगामी फळेच खावीत. (चेरी, पीच, जांभूळ, लीची, डाळिंब, सफरचंद इत्यादी.)

 • सकाळी उठल्यावर दीड ग्रॅम बारीक केलेली दालचिनी एक पेला गरम पाण्यात टाकून घ्यावी

 • अद्रक, तुळस, लवंग यांचा समावेश करणे उपयुक्त

 • गाजर, बीट, काकडी व मोड आलेल्या कडधान्यांचे सलाड खावे.

 • काढा व पौष्टिक भाज्यांचे सूप घ्यावे.

 • अन्न शिजवल्यावर अर्ध्या तासाच्या आत खाणे सर्वोत्तम.

 • करडईच्या तेलाचा वापर स्वयंपाकात करणे.

काय खाऊ नये ?

 • रस्त्यावरील फास्टफूड खाऊ नये.

 • शरीराला अपायकारक व विरुद्ध आहार नसावा.

 • पावसाळ्यामध्ये न पिकणारी फळे आणि भाज्या खाऊ नये.

 • सॉफ्टड्रिंक्स, खूप दिवस साठवलेले अन्नपदार्थ खाऊ नये.

 • चाट प्रकार, चिंच, खूप तेलकट पदार्थ टाळावेत.

loading image