esakal | पुण्याच्या मैथिलीची हार्वर्डमध्ये निवड
sakal

बोलून बातमी शोधा

Maithili joshi

पुण्याच्या मैथिलीची हार्वर्डमध्ये निवड

sakal_logo
By
सम्राट कदम - सकाळ वृत्तसेवा

पुणे : बारावी पर्यंतचे शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयात (fergusson college) पूर्ण करणाऱ्या मैथिली जोशीची (Maithili joshi) हार्वर्ड विद्यापीठात (Harvard University) संशोधनासाठी निवड झाली आहे. मुंबईच्या रसायन तंत्रज्ञान संस्थेतून (ICT) फार्मास्युटिकल केमिस्ट्रीमध्ये बी.टेक. झालेली मैथिली आता औषध वितरण आणि जैवपदार्थाशी निगडित संशोधन करणार आहे. ज्याचा थेट फायदा मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग आदी सहव्याधींच्या उपचारासाठी होऊ शकतो. (Maithili joshi from Pune selected at Harvard)

पुण्यातच लहानाची मोठ्या झालेल्या मैथिलीला विज्ञानाची गोडी आपल्या आईकडून मिळाली. ती म्हणते, ‘‘माझी आई विज्ञानाची शिक्षिका असल्यामुळे नववी, दहावीपासूनच मला विज्ञान शाखेत शिक्षण घ्यायची ओढ लागली होती. बारावी पर्यंतमी जीवशास्त्र आणि गणित हे दोन्ही विषय घेतले होते. म्हणूनच बीटेक ला जाताना अभियांत्रिकी आणि जीवशास्त्र यांचा मिलाप असलेली जैवअभियांत्रिकीची शाखा मी निवडली.’’

हेही वाचा: पुण्यात कोण पॉवरफुल्ल? राष्ट्रवादी-भाजपची पोस्टरबाजी

हार्वर्डमध्ये जैववैद्यकीय तंत्रज्ञान या विद्याशाखेच्याअंतर्गत मैथिली डॉ.समीर मित्रगोत्री यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावी औषधोपचार आणि वेदना रहित इंजेक्शन प्रणाली संदर्भात संशोधन करणार आहे. बी.टेक. नंतर थेट पीएच.डी. साठी तिची निवड झाली आहे. तिचे शालेय शिक्षण अभिनव महाविद्यालय येथे झाले असून, तिला बॅडमिंटन आणि व्हॉलिबॉल खेळण्याचा छंद आहे.

हेही वाचा: 'माणूस'कार श्री. ग. माजगावकर पुरस्कार श्रीकांत बहुलकर यांना जाहीर

मैथिलीची निवड का झाली?

  • कोरोनासाठी उपलब्ध औषधांच्या पुणर्वापरासंबंधी आणि सेंद्रिय रसायनशास्त्रातील दोन शोधनिबंध आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकेत प्रकाशित झाले.

  • आयसीटी मधील बीटेकच्या चारही वर्षांत चांगले गुण मिळविले.

  • ग्रॅज्युएट रेकॉर्ड एक्झामिनेशनमध्ये उल्लेखनीय कामगिरी.

  • संशोधन कोणत्या क्षेत्रात आणि का करायचे आहे याची स्पष्टता.

विद्यार्थी मित्रांसाठी टिप्स

  • पदवीचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांच्या संपर्कात रहा.

  • आपल्या आवडीचे संशोधन क्षेत्र निवडून त्यात इंटर्नशिप करा.

  • उद्योगांना अपेक्षीत दृष्टिकोन ठेवावा.

  • आपला सीजीपीए अर्थात गुणांची टक्केवारी चांगली ठेवा.

हेही वाचा: नियोजन समितीवरील सदस्यांची नियुक्ती; आमदार, खासदारांसह तीस सदस्यांचा समावेश

याबाबत बोलताना मैथिली जोशी यांनी सांगितले, "आता हार्वर्डमधील मला संशोधनाची संधी मिळाली आहे. मी ज्या प्रयोगशाळेत काम करणार आहे. त्यामध्ये दुर्धर आजारांच्या औषधांच्या वितरणासंदर्भात संशोधन होत आहे. माझ्या संशोधनाच्या माध्यमातून औषधांची अचूकता आणि परिणामकारकता वाढविण्यासाठी मी प्रयत्नशील असेल."

loading image