‘पंतप्रधान खोटे बोलतात’ ही लाजीरवाणी गोष्ट

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 डिसेंबर 2019

‘१९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यात संघाच्या वतीने सहभागी होण्यास हेडगेवारांनी आक्षेप घेतला होता. अशी विचारधारा असणाऱ्या पक्षाचे पंतप्रधान व गृहमंत्री जनतेशी अनेकदा खोटे बोलतात, ही बाब अत्यंत लाजीरवाणी आहे,’’ अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांनी केली.

पिंपरी - ‘१९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यात संघाच्या वतीने सहभागी होण्यास हेडगेवारांनी आक्षेप घेतला होता. अशी विचारधारा असणाऱ्या पक्षाचे पंतप्रधान व गृहमंत्री जनतेशी अनेकदा खोटे बोलतात, ही बाब अत्यंत लाजीरवाणी आहे,’’ अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांनी केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काँग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त शनिवारी (दि. २८) त्यांच्या हस्ते प्राधिकरण-आकुर्डी येथील कार्यक्रमात ध्वजवंदन करण्यात आले. या वेळी पक्षाचे शहराध्यक्ष सचिन साठे, माजी महापौर कविचंद भाट, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, तुकाराम भोंडवे, ज्येष्ठ नेत्या बिंदू तिवारी आदी उपस्थित होते. डॉ. महाजन म्हणाले की, ‘‘एनआरसी फक्त आसाम राज्यापुरते मर्यादित होते. हिंदू वोट बॅंकेचा फायदा घेण्याचा भाजप प्रयत्न करत आहे. आसाममध्ये १९ लाख घुसखोर निघाले. त्यात १६ लाख हिंदू होते. भाजपच्या मागील पाच वर्षांच्या कार्यकालापेक्षा काँग्रेसच्या काळात जास्त घुसखोर शोधून त्यांना परत त्यांच्या देशात पाठविले. ही आकडेवारी भाजपनेच संसदेत सादर केली आहे. एनपीआर-एनसीआर (राष्ट्रीय जनगणना आणि नागरिकत्व सुधारणा) यांचा काही संबंध नाही’’, असे सांगत गृहमंत्री खोटे बोलत असल्याचे ते म्हणाले.

अमृता फडणवीसांचे पुन्हा एकदा ट्विट आणि पुन्हा 'हेच' लक्ष्य

पक्षाचे ‘काँग्रेस’ हे नाव न्यायमूर्ती रानडे यांनी ठरविले. भारतीय परंपरेला आधुनिकतेचे रूप न्या. रानडे यांनी दिले. काँग्रेस पक्षाचा इतिहास उपलब्ध आहे. तसा इतर पक्षांना इतिहास आहे. त्यांचे स्वातंत्र्य लढाईत योगदान नाही. उलट शामा प्रसाद मुखर्जी जनसंघाचे अध्यक्ष होण्याअगोदर पश्‍चिम बंगालमध्ये मुस्लिम लीगबरोबर सरकारमध्ये सहभागी झाल्याचे त्यांनी सांगितले. 

मयूर जयस्वाल यांनी सूत्रसंचालन केले. विशाल कसबे यांनी आभार मानले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Its a shame that the PM is lying