Ravindra Dhangekar accuses Murlidhar Mohol
esakal
जैन हॉस्टेल खरेदी प्रकरणावरून पुण्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अशातच आता शिवसेना शिंदे गटाचे नेते रविंद्र धंगेकर यांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर आणखी एक खळबळजनक आरोप केला आहे. मुरलीधर मोहोळ हे महापौर असताना मनपाची अधिकृत गाडी न वापरता एका बिल्डरची गाडी वापरत होते, असं ते म्हणाले. इतकंच नाही तर त्यांनी या गाडीचे फोटो आणि नंबरदेखील सांगितला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात पु्न्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.