
पुणे : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशनअंतर्गत पुणे जिल्ह्यातील गावांमध्ये पाण्याच्या योजनांची कामे सुरू आहेत. मात्र, सध्या योजनेसाठी निधीचा दुष्काळ पडला आहे. ज्या योजना पूर्ण झाल्या, त्यांची बिले रखडली आहेत. पुणे जिल्हा परिषदेला सध्या सुमारे तीनशे कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता असून, सध्या गावोगावची कामे केवळ निधीअभावी ठप्प होण्याच्या मार्गावर आहेत.