
Jalindernagar School
Sakal
नरेंद्र साठे
पुणे : पारंपरिक चौकटी मोडून, भविष्यातील तयारी प्राथमिक शाळेतच मुलांकडून करून घेणारी जिल्हा परिषदेची जालिंदरनगर प्राथमिक शाळा पुणे जिल्ह्यात आहे. येथे विद्यार्थ्यांना पाठांतरापुरते शिक्षण न देता त्यांना परकीय भाषा, कोडिंग, रोबोटिक्स, ड्रोन बांधणी, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), रेडिओ जॉकींसारख्या उपक्रमांतून प्रत्यक्ष अनुभव दिला जातो. आधुनिक तंत्रज्ञानासोबतच मूल्याधारित शिक्षणाची सांगड घालत या शाळेने आज जगात ‘सर्वोत्कृष्ट शाळा’ म्हणून नावलौकिक मिळवला आहे.