मुळा नदीपात्रात जलपर्णी वाढु लागली - हटविण्याची मागणी 

रमेश मोरे 
गुरुवार, 15 नोव्हेंबर 2018

जुनी सांगवी - जुनी सांगवी येथील मुळानदीपात्रात जलपर्णीची वाढ होवु लागल्याने नदीपात्रात जलपर्णीचे पुंजके फोफावताना दिसु लागले आहेत. जलपर्णीमुळे डास किटकांचा त्रास सांगवीकरांसाठी नविन नाही. गतवर्षी जुन अखेरपर्यंत सांगवीकरांना डासांच्या त्रासाचा सामना करावा लागला होता.प्रशासनाकडुन गतवर्षी जलपर्णी हटविण्याचे  काम धिम्या गतीने काम करण्यात आले होते. तर डासाच्या त्रासाला कंटाळुन नागरीकांच्या आरोग्यासाठी काही सामाजिक संस्था, संघटना व पर्यावरणप्रेमी नागरीकांनी पुढाकार घेवुन जलपर्णी हटविण्याचे काम केले होते. सध्या मुळानदीपात्रात जलपर्णी वाढु लागल्याने डास किटकांच्या उत्पत्तीत वाढ होवु लागली आहे.

जुनी सांगवी - जुनी सांगवी येथील मुळानदीपात्रात जलपर्णीची वाढ होवु लागल्याने नदीपात्रात जलपर्णीचे पुंजके फोफावताना दिसु लागले आहेत. जलपर्णीमुळे डास किटकांचा त्रास सांगवीकरांसाठी नविन नाही. गतवर्षी जुन अखेरपर्यंत सांगवीकरांना डासांच्या त्रासाचा सामना करावा लागला होता.प्रशासनाकडुन गतवर्षी जलपर्णी हटविण्याचे  काम धिम्या गतीने काम करण्यात आले होते. तर डासाच्या त्रासाला कंटाळुन नागरीकांच्या आरोग्यासाठी काही सामाजिक संस्था, संघटना व पर्यावरणप्रेमी नागरीकांनी पुढाकार घेवुन जलपर्णी हटविण्याचे काम केले होते. सध्या मुळानदीपात्रात जलपर्णी वाढु लागल्याने डास किटकांच्या उत्पत्तीत वाढ होवु लागली आहे. जलपर्णी वाढुन मुळानदीपात्र आच्छादण्याआधीच प्रशासनाकडुन जलपर्णी काढण्यास सुरूवात करावी. अशी मागणी मनसेचे राजु सावळे यांनी पालिका प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनात म्हटले आहे की परिसरात जलपर्णीमुळे डासांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. दरवर्षी प्रशासन या कामासाठी ठेका देते मात्र तसे काम केले जात नाही सर्वसामान्य नागरीक सामाजिक संस्थांनी गतवर्षी नागरीकांच्या सहकार्याने जलपर्णी काढण्याचे काम केले. प्रशासनाकडुन या कामाचा केवळ दिखावा केला जातो. सध्या मुळानदीपात्रात जलपर्णीची वाढ होत आहे.नदीकिनारा रहिवाशांना डासांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.सध्या काही पर्यावरणप्रेमी नागरीक सामाजिक संस्थांनी जलपर्णी काढण्याचे काम चार आठवड्यापासुन सुरू केले आहे.प्रशासन मात्र दरवर्षी प्रमाणे याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसुन येत आहे. याबाबत आरोग्य विभागाशी संपर्क साधला असता संपर्क होवु शकला नाही.

प्रशासनाकडे या समस्येचा पाठपुरावा करून लवकरच हे काम सुरू करण्याबाबत सांगणार आहे. - हर्षल ढोरे नगरसेवक

सामाजिक संस्था व पर्यावरणप्रेमी नागरीकांनी जलपर्णी काढण्याचे काम सुरू केले आहे. प्रशासन मात्र दरवर्षीप्रमाणे यावर्षीही बघ्याची भुमिका घेत असल्याचे दिसत आहे. राजु सावळे - पर्यावरणप्रेमी

Web Title: jalparni in mula river