Pune Rural Police Crack Double Murder Case
Sakal
पुणे : गेल्या महिन्यात जामखेड येथे खून करून आरोपी पुण्यात आला. येथेही त्याने सासवडमध्ये ९ डिसेंबरला दुसरा खून केला. पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि तपासाच्या माध्यमातून आरोपीला जेरबंद करत दुहेरी खुनाचा गुन्हा उघडकीस आणला. नीरज गोस्वामी या आरोपीला पोलिसांनी अटक केली.