जम्मू ते कन्याकुमारी सायकल यात्रा

थेरगाव - रामकृष्ण मठ आणि निसर्ग सायकल मित्र, पुणे आयोजित स्वामी विवेकानंद विचार सायकल यात्रेला खासदार श्रीरंग बारणे यांनी शुभेच्छा दिल्या.
थेरगाव - रामकृष्ण मठ आणि निसर्ग सायकल मित्र, पुणे आयोजित स्वामी विवेकानंद विचार सायकल यात्रेला खासदार श्रीरंग बारणे यांनी शुभेच्छा दिल्या.

पिंपरी - स्वामी विवेकानंद यांचे विचार सर्वदूर पोचविणे आणि सायकलच्या प्रचार-प्रसाराचा संदेश देण्यासाठी शनिवारी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील नऊ सायकलपटू शनिवारपासून (ता. २४) जम्मू येथून कन्याकुमारीपर्यंत सुमारे चार हजार किलोमीटर अंतराची स्वामी विवेकानंद विचार सायकल यात्रा काढणार आहेत. २८ दिवसांचा प्रवास करून २१ डिसेंबरला विचार यात्रा कन्याकुमारीला पोचणार आहे. 

अमेरिकेतील शिकागो शहरामधील सर्वधर्म परिषदेत स्वामी विवेकानंद यांनी दिलेल्या जगप्रसिद्ध भाषणाला यंदाच्या वर्षी सव्वाशे वर्षे पूर्ण होत आहेत. त्याचे औचित्य साधून रामकृष्ण मठ, पुणे आणि निसर्ग सायकल मित्र, पुणे यांच्या वतीने जम्मू-कश्‍मीर ते कन्याकुमारी अशी स्वामी विवेकानंद विचार सायकल यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील पृथ्वीराज भोसले, सुरेश माने, सुनील पाटील, सुनील ननवरे, अतुल माने, राहुल नेवाळे, महेंद्र आटाळे, श्रीकांत खटके तसेच गुजरात येथून डॉ. नितीन पाटील सहभागी होणार आहेत. 

ननवरे म्हणाले, ‘‘स्वामी विवेकानंद यांचा संदेश तरुणांपर्यंत पोचविणे आणि सायकलचा प्रचार-प्रसार करणे हा विचार यात्रेचा उद्देश आहे. या यात्रेत मार्गावरील ठिकाणी स्वामी विवेकानंद यांचे संक्षिप्त चरित्र, त्यांची निवडक स्फूर्तिदायक वचने, सायकलिंगचे फायदे, यात्रेचे वेळापत्रक आणि सायकलपटूंची संक्षिप्त माहितीपर मराठी, हिंदी आणि इंग्रजीतील आठ हजार पत्रके वाटण्यात येणार आहेत. २१ डिसेंबरला कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद स्मारकालाही भेट देणार आहोत. यात्रा मार्गावर आमचा पंजाबमधील गुरुद्वारा, धर्मशाळा आणि १८ रामकृष्ण मठांत रात्रीचा मुक्काम राहणार आहे.’’

जम्मूहून गुरुदासपूर, अमृतसर, लुधियाना, अंबाला, सोनीपत, बहादूरगड, खेत्री, जयपूर, अजमेर, करेरा, उदयपूर, मोडसा, बडोदा, नवसारी, तलासरी, डोंबिवली, पुणे, सातारा, कोल्हापूर, बेळगावमार्गे पुढे शिगाव, चित्रदुर्ग, तुमकूर, बंगळुरू, सेलम मार्गे दिंडीगड आणि कोविलपट्टी असा यात्रेचा मार्ग राहणार आहे.

प्रथमोपचार कीट भेट
खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील, श्रीरंग बारणे, अमर साबळे, आमदार महेश लांडगे, ॲड. गौतम चाबुकस्वार यांनी सर्व सायकलपटूंना विचार यात्रेबद्दल शुभेच्छा दिल्या. फॅमिली फिजिशियन असोसिएशनतर्फे डॉ. धनराज हेळंबे यांनी त्यांना प्रथमोपचार कीट भेट दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com