esakal | Coronavirus : पिंपरीत पूर्वसंध्येलाच ‘जनता कर्फ्यू’
sakal

बोलून बातमी शोधा

चिंचवड - कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर बंद असल्याने स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर शनिवारी शुकशुकाट होता.

पोलिस यंत्रणा सज्ज
जमावबंदी असल्याने अत्यावश्‍यक सेवा वगळता इतर दुकाने सुरू न ठेवण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिलेले आहेत. त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईही केली जात आहे. रविवारी (ता. २२) आयुक्तालयाच्या हद्दीतील पंधरा पोलिस ठाणी व तीन चौकीअंतर्गत कडेकोट बंदोबस्त तैनात असेल.

घाऊक बाजारपेठ बंद 
किराणा मालाच्या घाऊक बाजार रविवारी संपूर्ण दिवस आणि सोमवारी व मंगळवारी दुपारी चारनंतर बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला. संघटनेचे अध्यक्ष श्‍याम मेघराजानी, संजय रामचंदानी, हिराशेठ पंजाबी, प्रदीप गिरिजा, श्री कुकरेजा, भरत कुकरेजा, पवन गिरिजा, सुशील बजाज उपस्थित होते. मंगळवारी सायंकाळी परिस्थिती लक्षात घेऊन पुढील निर्णय घेण्याचेही निश्‍चित करण्याचेही ठरविले.

Coronavirus : पिंपरीत पूर्वसंध्येलाच ‘जनता कर्फ्यू’

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात दुसऱ्या दिवशीही शुकशुकाट राहिला. प्रमुख रस्त्यांपासून अंतर्गत भागातील रस्त्यांवर क्वचित एखादे वाहन दिसत होते. तसेच, टपऱ्यांपासून मॉलपर्यंत सर्व काही बंद राहिले. किराणा दुकान व पेट्रोल पंपांवर मोठी गर्दी होती. मात्र, दुपारी बारानंतर तेही बंद झाले. जादा खरेदीमुळे दूध व दुग्धजन्य पदार्थांचा तुटवडा निर्माण झाला आहे. रविवारी (ता. २२) होणाऱ्या ‘जनता कर्फ्यू’ची सुरुवात शनिवारपासूनचझाल्याचे पाहायला मिळाले.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सध्या सर्वत्रच जमावबंदी लागू असून, पाच किंवा त्यापेक्षा अधिक नागरिकांना एकत्र येण्यास मनाई आहे. मात्र, व्यापारी व किरकोळ विक्रेत्यांनी याला प्रतिसाद दिला नव्हता. पिंपरी कॅम्प बाजारपेठ सुरू होती. मात्र, जनतेतून उठलेल्या संतप्त प्रतिक्रिया आणि जमावबंदी आदेशाचा भंग केल्यास कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले. तसेच, दुकानदारांवर कारवाईचे पाऊल उचलले. त्यामुळे शनिवारी हातगाड्यांपासून मोठी शोरूम्स बंद राहिली. जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने सुरू होती. तिथे खरेदीसाठी गर्दी होती. तरतूद असावी म्हणून केलेली जादा खरेदी व मालवाहतूक बंद असल्याने तेलापासून डाळीपर्यंत अनेक वस्तू संपल्याने अनेक दुकाने दुपारी बारापूर्वीच बंद राहिली. सर्वाधिक विक्री दूध व दुग्धजन्य पदार्थांची झाली. रविवारी ‘जनता कर्फ्यू’ असल्याने सोमवारीच (ता. २३) दूध उपलब्ध होणार आहे.

पोलिस यंत्रणा सज्ज
जमावबंदी असल्याने अत्यावश्‍यक सेवा वगळता इतर दुकाने सुरू न ठेवण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिलेले आहेत. त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईही केली जात आहे. रविवारी (ता. २२) आयुक्तालयाच्या हद्दीतील पंधरा पोलिस ठाणी व तीन चौकीअंतर्गत कडेकोट बंदोबस्त तैनात असेल.

घाऊक बाजारपेठ बंद 
किराणा मालाच्या घाऊक बाजार रविवारी संपूर्ण दिवस आणि सोमवारी व मंगळवारी दुपारी चारनंतर बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला. संघटनेचे अध्यक्ष श्‍याम मेघराजानी, संजय रामचंदानी, हिराशेठ पंजाबी, प्रदीप गिरिजा, श्री कुकरेजा, भरत कुकरेजा, पवन गिरिजा, सुशील बजाज उपस्थित होते. मंगळवारी सायंकाळी परिस्थिती लक्षात घेऊन पुढील निर्णय घेण्याचेही निश्‍चित करण्याचेही ठरविले.

हाउसिंग सोसायटीचे गेट बंद ठेवा
सोसायटीतील रहिवाशांनी घराबाहेर पडू नये. सर्व प्रवेशद्वारे बंद ठेवावीत, काही तातडीच्या कामानिमित्त बाहेर जाणाऱ्यांची नोंद ठेवावी, असे आवाहन पिंपरी-चिंचवड को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी फेडरेशनने व्हॉट्‌सॲप ग्रुप, ट्विटर अकाउंट, फेसबुक पेज यावरून सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना केले आहे. फेडरेशनमध्ये तीन हजार सोसायटी जोडलेल्या आहेत, अशी माहिती फेडरेशनच्या अध्यक्षा तेजस्विनी ढोमसे यांनी दिली.

loading image