जंतर-मंतर आंदोलनात ७०० हून अधिक जण ताब्यात

जंतर-मंतर आंदोलनात 
७०० हून अधिक जण ताब्यात
Published on: 

जंतर-मंतर आंदोलनात
७०० हून अधिक जण ताब्यात

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी शुक्रवारी (ता. २) जंतर-मंतर येथे झालेल्या आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांनी ७०० हून अधिक आंदोलकांना ताब्यात घेतले. यामध्ये आम आदमी पक्षाचे नेते सौरभ भारद्वाज, संजीव झा, आतिशी आणि संजय सिंह तसेच विविध विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरावलोकनात (एसआयआर) कथित अनियमितता आणि मोठ्या प्रमाणात मतदारांची नावे वगळल्याच्या मुद्द्यावरून हे आंदोलन करण्यात आले. आयसा, एसएफआय, एनएसयूआयसह विविध विद्यार्थी संघटनांचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली मेट्रोची १२ स्थानके बंद ठेवण्यात आली. जंतर-मंतर, कनॉट प्लेस, पटेल चौक, जीपीओ, टॉल्स्टॉय मार्ग, पार्लमेंट स्ट्रीट आणि परिसरातील रस्त्यांवरील वाहतूक वळविण्यात आली. राजीव चौक, मंडी हाउस, आयएनए आणि सेंट्रल सेक्रेटरिएट येथे इंटरचेंजची सुविधा उपलब्ध ठेवण्यात आली.
दरम्यान, जंतर-मंतरकडे जात असताना योगेंद्र यादव यांनाही पोलिसांनी रोखल्याचे वृत्त आहे. आंदोलनासाठी एकत्र आलेल्या युवक आणि विद्यार्थ्यांना ताब्यात घेतल्याबद्दल भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (मार्क्सवादी) निषेध व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com