

New Genotype of Japanese Encephalitis Virus Detected in Mosquitoes for the First Time by NIV Pune
पुणे : जपानी मेंदूज्वर (जॅपनीज इन्सेफेलायटिस – जेई)चा विषाणू डुकरांमध्ये आढळतो व त्याचा प्रसार डासांमार्फत मानवाला होतो. मात्र, पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने (एनआयव्ही) केलेल्या अलीकडील संशोधनानुसार या विषाणूचा 'जी-१' (जीआय) हा जनुकीय प्रकार (जीनोटाइप) डासांमध्येही प्रथमच आढळून आला आहे.