esakal | ‘माझ्या आईला बेड मिळण्यासाठी वडील भटकत होते’; रूग्णालयातील यंत्रणेवर जास्मीन संतापली

बोलून बातमी शोधा

माझ्या आईला बेड मिळण्यासाठी वडील भटकत होते; जास्मीन संतापली
माझ्या आईला बेड मिळण्यासाठी वडील भटकत होते; जास्मीन संतापली
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

'बिग बॉस' सीझन 14 मुळे चर्चेत आलेली छोट्या पडद्यावरील प्रसिध्द अभिनेत्री म्हणजे जास्मीन भसीन. ती तिच्या आई वडिलांवर आतोनात प्रेम करते. 'बिग बॉस'मध्ये जास्मीन स्पर्धक असताना तिच्या आई वडिलांनी 'बिग बॉस'च्या घरात येऊन तिला आशीर्वाद दिला होता. या वेळी जास्मीन आणि तिच्या आई वडिलांमधील नाते प्रेक्षकांना पहायला मिळाले. जास्मीनने आई वडिलांबद्दल नुकतच एक ट्विट केले आहे. या ट्विटची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.

कोरोना रूग्णांची संख्या सध्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे अनेक रूग्णांना रूग्णालयांमध्ये बेड उपलब्ध होत नाहीत. अनेक नागरिकांना बेड मिळवण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. जास्मीनच्या कुटुंबालादेखील हा त्रास सहन करावा लागत आहे. जास्मीनच्या आईला देखील सध्या उपचारासाठी बेड मिळवण्यासाठी खूप फिरावे लागले. तिने ट्विट करुन सांगितले ''मी खूप दु:खी आहे. रोज लोकांचे मृत्यू होत आहेत. लोक ऑक्सिजन व बेडच्या शोधात रस्त्यावर वणवण भटकत आहेत. दोन दिवसांपूर्वी माझ्या आईलाही याच स्थितीतून जावे लागले. तिला बेड मिळण्यासाठी खूप धावाधाव करावी लागली. माझे वयोवृध्द आई- वडील उपचारासाठी चौफेर वणवण भटकले. अनेक लोक याच परिस्थितीमधून जात आहेत.’

हेही वाचा: ''फडणवीस जे म्हणतात ते व्यवहारात आणतात''

याच विषयासंदर्भात जास्मीनने दुसऱ्या ट्विटमध्ये लिहिले, ‘लोक आपल्या आप्तांना, मित्रांना गमवत आहेत. आम्ही कोणाला दोष द्यायचा? आपली यंत्रणा अपयशी ठरली का?’. या ट्विटमधून जास्मीनने य़ंत्रणेला सवाल केला आहे. तिच्या या ट्विटला समर्थन देत अनेक नेटकऱ्यांनी या स्थितीचा निषेद केला.