esakal | ''फडणवीस जे म्हणतात ते व्यवहारात आणतात'' विजयानंतर चंद्रकांत पाटलांनी सत्ताधाऱ्यांवर साधला निशाना

बोलून बातमी शोधा

Devendra-Fadnavis-Chandrakant-Patil
''फडणवीस जे म्हणतात ते व्यवहारात आणतात''
sakal_logo
By
सागर आव्हाड

पुणे : पंढरपूरचा निकाल घोषित झाला असून भाजप समाधान अवताडे निवडून आले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी समाधान अवताडे आणि प्रशांत मालक यांचे अभिनंदन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, आजच्या कलियुगात शक्य नाही ते त्यांनी करून दाखवलं. कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन काम केलं हा त्याचा विजय आहे. सरकार विरोधात जनतेच्या मनात रोष आहे म्हणून हा विजय शक्य झाला. ''उद्धवजी राज्य चालवू शकत नाही, हे लोकांच्या मनात फिक्स झालयं. हे नेतृत्व लोकांना मान्य नाही

हेही वाचा: पुणे : पोलिसांच्या तत्परतेने वाचले २० रुग्णांचे प्राण

''देवेंद्र फडणवीस यांनी अवताडे यांना निवडून द्या, मी सरकारचा करेक्ट कार्यक्रम करतो'' असे म्हणाले होते. याच मुद्द्यावरुन चंद्रकांत पाटील यांनी ''देवेंद्र फडणवीस जे म्हणतात ते व्यवहारात आणतात पंढरपूरच्या लोकांनी त्यांचं काम केलंय आता फडणवीस त्यांचं काम करतील.'' असे सांगितले. ''आपआपल्या संबंधांमुळे आपोआप आघाडी सरकारमध्ये पोकळी निर्माण होईल '' असेही पाटील यावेळी म्हणाले.

हेही वाचा: Pandharpur Elections : आवताडे विजयाच्या शिखरावर ! फेरी 36वी; आघाडी 4102 मतांची

Pandharpur Elections : आवताडे विजयाच्या शिखरावर !

अवघ्या काहीच फेऱ्यांमध्ये आघाडी घेतलेल्या भगीरथ भालके यांना मागे सारून सलग फेऱ्यांमध्ये मतांची आघाडी घेतलेले भाजपचे समाधान आवताडे यांनी 36व्या फेरीअखेर मतांची आघाडी कायम राखली असून, त्यांना 36व्या फेरीत 1,04,285 तर राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांना 1,00,183 मते मिळाली आहेत. समाधान आवताडे यांनी 4,102 मतांची आघाडी घेतली आहे. आणखी काही फेऱ्यांचीच मोजणी शिल्लक असून, अवताडे यांचा विजय पक्का झाल्यातच जमा आहे.