जावळी गौरव पुरस्कार सोहळ्याचे ५ नोव्हेंबर रोजी मेढ्यात आयोजन

जावळी गौरव पुरस्कार सोहळ्याचे ५ नोव्हेंबर रोजी मेढ्यात आयोजन
Published on: 

जावळी गौरव पुरस्कारांचे आज वितरण

मेढ्यात कार्यक्रम; विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सन्मान

आनेवाडी, ता. ४ ः जावळी येथील मित्रमेळा फाउंडेशनच्या वतीने जागतिक मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून उद्या (गुरुवार) दुपारी एक वाजता ‘जावळी गौरव पुरस्कार सोहळा २०२६’ होईल. मेढ्यातील कलश मंगल कार्यालयात हा कार्यक्रम होईल.
या वेळी सामाजिक, नाट्य, साहित्य, उद्योजकता, आध्यात्मिक, शैक्षणिक, क्रीडा, कला, कृषी आणि पर्यावरण अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा गौरव करण्यात येईल. यात सामाजिकसाठी सदाशिव सपकाळ, नाट्य क्षेत्रासाठी रमाकांत जाधव, साहित्यासाठी ऋषिकांत राऊत, उद्योजकतासाठी पीआयपी ॲग्रो, बिभवी, आध्यात्मिकसाठी आनंदराव मिस्त्री, शैक्षणिकसाठी सत्यम धनावडे, क्रीडासाठी अनघा शिंगाडे, सामाजिक कार्यासाठी श्रमिक जनता विकास संस्था, मेढा, नाट्य चळवळीसाठी भैरवनाथ व्यायाम मंडळ, मेढा, कृषी क्षेत्रासाठी नीलेश तरडे, शिक्षण क्षेत्रासाठी समीर आगलावे, शैक्षणिक क्षेत्रासाठी विनय पवार, क्रीडा क्षेत्रासाठी ज्ञानेश्वर कबड्डी संघ, काटवली, कला क्षेत्रासाठी कांचन धनावडे आणि पर्यावरण क्षेत्रासाठी ग्रामपंचायत चिंचणी यांची पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
कार्यक्रमास मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, वसंतराव मानकुमरे, सभापती सौरभ शिंदे, शिवसेना प्रवक्ते अंकुश कदम यांच्यासह साहित्यिक प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे उपस्थित राहतील. राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहील. कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन जावळी मित्रमेळा फाउंडेशनतर्फे केले आहे.

..................................................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.