Jayant Narlikar Passes Away: खगोलशास्त्रातील तेजस्वी तारा निखळला... जयंत नारळीकर यांचे निधन!

Jayant Narlikar Indian astrophysicist passes away: जगप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ आणि लेखक डॉ. जयंत नारळीकर यांचे वयाच्या 86व्या वर्षी निधन. त्यांच्या वैज्ञानिक आणि साहित्यिक योगदानाने विश्वाला नवी दिशा दिली.
Jayant Narlikar
Jayant Narlikaresakal
Updated on: 

Jayant Narlikar Passes Away: भारतीय खगोलशास्त्र आणि विज्ञान साहित्य क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्त्व, डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचे वयाच्या 86व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. पुण्यातील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी शांतपणे अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने वैज्ञानिक आणि साहित्यिक विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांनी खगोलशास्त्रातील संशोधन आणि विज्ञानाचा सामान्यांपर्यंत प्रसार यासाठी केलेले कार्य अविस्मरणीय आहे.

Loading content, please wait...