esakal | चंद्रकांत पाटील काहीही बोलतात; जयंत पाटील यांचा टोला
sakal

बोलून बातमी शोधा

Jayant Patil

चंद्रकांत पाटील काहीही बोलतात; जयंत पाटील यांचा टोला

sakal_logo
By
टीम सकाळ

पुणे : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांच्यावर केलेल्या टीकेला राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी उत्तर दिलं आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री म्हणून जयंत पाटील 4 दिवस सांगलीला थांबले तर पुण्याचे पालकमंत्री असूनही अजित पवार आठवड्यातून एक दिवस भेट देतात असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला. याला प्रत्यूतर देताना जंयत पाटील म्हणाले, ''अजित पवारांवर संपूर्ण राज्याची जबाबदारी पूर्णपणे आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील कोरोनास्थितीवर निंयत्रण ठेवण्याचे काम ते करत आहेत. पुण्यावरही त्यांचे पूर्ण लक्ष \आहे. येथे अगदी छोटा प्रश्न असेल तरी तो सोडविण्यासाठी उपस्थित असतात. अनेकवेळा पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये येऊन बैठका घेऊन प्रश्न सोडवत असतात. चंद्रकात पाटील काहीतरी बोलायचे म्हणून बोलत असतात असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

चंद्रकांत पाटलांच्या टीकेला उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, ''चंद्रकांत पाटलांनाच माहित नाही की त्यांच्या पक्षाचे लोक किती मला येऊन भेटले? ते त्यांच्या लोकप्रतिनिंधींना भेटले'' याबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले, की ''कोल्हापुरचे चंद्रकांत पाटील पुण्यात येऊन उभे राहिले, त्यांना पुण्यातील जनतेने निवडून दिलेले आहे. त्यामुळे पुण्यासाठी मी काहीतरी करतोय हे सांगण्याचा जर ते प्रयत्न करत असतील आणि त्याच्यासाठी अजित पवारांवर टीका करत असतील. तसं असेल तर त्याकडे पुणेकरांनी लक्ष देण्याची आवश्यकता नाही.''

''अजित पवार किती झपाट्याने काम करतात, किती वेगाने काम करतात, कशा पद्धतीने काम करतात हे महाराष्ट्राला माहिती आहे असंही जयंत पाटील यांनी सांगितलं.

महाविकास आघाडी सरकार लसीकरणाचे श्रेय घेत आहे, केंद्राची प्रतिमा जनतेच्या मनातून उतरवली जाते असा प्रश्न प्रविण दरेकरांनी उपस्थित केला आहे. त्याबाबत उत्तर देताना, जंयत पाटील म्हणाले, ''जनेतेची बाजू घेऊन स्थानिक सरकार बोलत असेल तर हा श्रेयवाद नाही. केंद्र सरकारकडून ऑक्सिजन वाटप होते, केंद्र सराकारकडून रेमेडेसिव्हिर वाटप होते. पण केंद्र सरकार महाराष्ट्राला कमी प्रमाणात लस देत आहे. लोकसंख्येच्या महाराष्ट्रात प्रमाणात लस द्या. जेवढ्या प्रमाणात कोरोना महाराष्ट्रात पसरला आहे त्या प्रमाणात रेमडेसिव्हिर द्या. लोकसंख्येनुसार उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राची लोकसंख्या जास्त आहे. त्या तुलनेने महाराष्ट्रापेक्षा जास्त रेमेडिसिव्हीर ज्या राज्यात गेलेत त्या राज्याबद्दल लोकही प्रश्न विचारतात. एवढाच त्याचा भाग आहे. दरकेरांनी वाईट वाटून घेऊ नये.''

loading image