

‘जे. बी. फूड’च्या आउटलेटचे
गजवडीत उद्घाटन उत्साहात
परळी, ता. १७ : गजवडी (ता. सातारा) येथे ‘जे. बी. फूड प्रोसेसिंग’ या कंपनीच्या नवीन आउटलेटचे उद्घाटन ज्ञानश्री व शिवसह्याद्री परिवाराचे संस्थापक ज्ञानेश्वर वांगडे (भाई) यांच्या हस्ते झाले.
गजवडी येथे उद्योजक पटेल यांनी ‘जे. बी. फूड प्रोसेसिंग’चे एक युनिट उभारले आहे. या युनिटच्या माध्यमातून जांभूळ बी, मोरिंगा (शेवगा), आवळा पावडर आणि आले पावडर अशा विविध प्रकारच्या उच्च दर्जाच्या आरोग्यदायी पावडर्सची निर्मिती केली जात आहे. या प्रकल्पामुळे स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध झाला असून, अन्नप्रक्रिया (फूड प्रोसेसिंग) क्षेत्रात या व्यवसायाने आपली एक नवी ओळख निर्माण केली आहे.
ग्रामीण भागात प्रक्रिया उद्योगांच्या माध्यमातून रोजगाराची निर्मिती होणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन श्री. वांगडे यांनी केले.
कार्यक्रमाला परिसरातील मान्यवर, ग्रामस्थ आणि व्यावसायिक उपस्थित होते.
-------------------
42820
गजवडी ः येथे ‘जे. बी. फूड प्रोसेसिंग’च्या आउटलेटच्या उद्घाटनप्रसंगी मान्यवर.
----------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.