जेसीबी अंगावरून गेल्याने झोपलेला ट्रकचालक गंभीर जखमी होऊन मयत ; टेंभुर्णी एमआयडीसीतील घटना

जेसीबी अंगावरून गेल्याने झोपलेला ट्रकचालक गंभीर जखमी होऊन मयत ; टेंभुर्णी एमआयडीसीतील घटना
Published on

जेसीबी अंगावरून गेल्याने
टेंभुर्णीत ट्रकचालक ठार

एमआयडीसीतील गोडावूनमध्ये झोपल्यावर घटना

टेंभुर्णी, ता. २१ : टेंभुर्णी एमआयडीसीतील तुळजाभवानी पेपर मिल या कंपनीमध्ये माल भरण्यासाठी आलेल्या ट्रकचे चालक चालू काम असलेल्या गोडावूनमध्ये झोपले असता जेसीबी अंगावरून गेल्याने गंभीर जखमी होऊन ते उपचारपूर्वीच मयत झाले. ही घटना सोमवारी मध्यरात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास घडली.
सुलतान खान मेहबुब खान (वय ६९ रा.दत्तनगर मालेगाव, जि. नाशिक) असे मृताचे नाव आहे. मृत सुलतान खान मेहबुब खान हे ट्रकचालक असून टेंभुर्णी एमआयडीसीतील तुळजाभवानी पेपर मिल या कंपनीमध्ये माल भरण्यासाठी ट्रक घेऊन आले होते. कंपनीमध्ये ट्रक लावून काम चालू असलेल्या गोडावूनमध्ये जाऊन झोपले होते. कंपनीमधील जेसीबीचालक (एम.एच. ४५/ ए.क्यु ६७२३) राजीव कुमार आदिवासी (रा. घोरकाट, जि. सतना गोकर्त, मध्यप्रदेश) याने त्याच्या ताब्यातील जेसीबी मशीन निष्काळजीपणाने रिव्हर्स घेऊन सुलतान खान मेहबुब खान हे झोपलेल्या ठिकाणी जेसीबी अंगावरून गेल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. टेंभुर्णी पोलिस ठाण्यात मृताचा पुतण्या मतीन खान उस्मान खान (वय ४४ रा.दत्त नगर मालेगाव जि. नाशिक) यांनी जेसीबी चालक राजीव कुमार आदिवासी याच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली असून पुढील तपास हवालदार ज्ञानदेव सरडे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com