'जेईई मेन' परीक्षा मेच्या शेवटच्या आठवड्यात 

JEE Main exam last weekend in May 2020
JEE Main exam last weekend in May 2020

पुणे : अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी महत्वाची असलेली राष्ट्रीय स्तरावरील 'जेईई मेन' ही परीक्षा आता मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणार असल्याचे नॅशनल टेस्टिंग एजन्सीने स्पष्ट केले आहे. त्यामुळे विद्यार्थांना अभ्यासासाठी जवळपास आणखी दोन महिन्यांचा वेळ मिळाला आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
देशात 'कोरोना'चा प्रभाव वाढल्याने जवळपास सर्वच महत्त्वाच्या प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक बदलले आहे. याचा फटका 'जेईई मेन'लाही बसला आहे. नियोजित वेळापत्रकानुसार ही परीक्षा ५ ते ११ एप्रिल या दरम्यान घेतली जाणार होती. मात्र, देशभरात कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेले वातावरण लक्षात घेऊन ही परीक्षा तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय नॅशनल टेस्टिंग एजन्सीने १८ मार्च रोजी घेतला होता. या परीक्षेच्या नवीन तारखा 31 मार्च रोजी जाहीर केल्या जातील असेही 'एनटीए'ने स्पष्ट केले होते. 


त्यानुसार आज (सोमवारी) ही परीक्षा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घेण्याचे प्रस्तावित असल्याचे असल्याचे 'एनटीए'ने प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्रसिद्ध केले आहे. देशातील सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता, रोज अनेक नवे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे अशा वातावरणात एप्रिल महिन्यात जेईई परीक्षा घेणे योग्य नाही. पुढील काही दिवसात कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर त्याबाबतचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. तर, जेईई मेन परीक्षेचे प्रवेशपत्र १५ एप्रिलनंतर "एनटीए'च्या संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे एजन्सीने प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे. या संदर्भातील अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी jeemain.nta.nic.in आणि www.nta.ac.in या संकेतस्थळास  भेट द्यावी.

Lockdown : रेल्वेची आरक्षण केंद्रे 14 एप्रिलपर्यंत बंद

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com