Jejuri Wari Accident : जेजुरी अपघातातील जखमी वारकऱ्यांची सुनेत्रा पवार यांच्याकडून विचारपूस, अधिकाऱ्यांना दिले महत्त्वाचे निर्देश

Ashadhi Wari Tragedy छ नांदेडच्या दिंडीतील ट्रकने सांगलीच्या दिंडीतील पायी चालणाऱ्या महिलांना धडक दिली. जखमींवर जेजुरी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू, काहींची प्रकृती गंभीर. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी रुग्णालयात भेट देऊन उपचारांचा आढावा घेतला.
DCM Sunetra Pawar Visit Jejuri Rural Hospital

DCM Sunetra Pawar Visit Jejuri Rural Hospital

esakal

Updated on

आषाढी वारीच्या उत्साहाला सोमवारी (दि. १३) सकाळी जेजुरीजवळ झालेल्या भीषण अपघाताने गालबोट लागले. सासवड येथून जेजुरीकडे मार्गस्थ झालेल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यादरम्यान बेलसर टोलनाक्याजवळ ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर चार महिला गंभीर जखमी झाल्या. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण वारकरी संप्रदायात शोककळा पसरली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com