Pune Crime News: येरवड्यात सोनाराच्या दुकानातून खरेदीच्या बहाण्याने वीस लाखांचे दागिने लांबवले

सोने खरेदीचा बहाणा करून आलेल्या सहा जणांनी येरवड्यातील सोन्याच्या दुकानातून दागिने पळविले.
Pune Crime News
Pune Crime NewsSakal

विश्रांतवाडी - सोने खरेदीचा बहाणा करून आलेल्या सहा जणांनी येरवड्यातील सोन्याच्या दुकानातून दागिने पळविले. यामध्ये चोरट्यांनी सुमारे वीस लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली.

या प्रकरणी महावीर ज्वेलर्सचे राकेश गोपीलाल जैन (वय 24, रा. पलेंटनं.3, नीता पार्क सोसायटी येरवडा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी सहा चोरांविरुद्ध येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या चोरीच्या घटनेमुळे येरवडा व परिसरातील व्यापार्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला आहे.

मात्र त्याच सोबत सोने व्यावसायिकांनी सुरक्षेबाबतच्या आवश्यकता सर्व उपायोजनादेखील करणे गरजेचे असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी यावेळी सांगितले. येरवडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास येरवड्यातील जैनमंदिरासमोर असणाच्या महावीर ज्वेलर्स येथे सहा अनोळखी इसम सोने खरेदीसाठी आलेले होते.

याचवेळी सोन्याच्या खरेदीचा बहाणा करून त्यांनी सोनाराच्या दुकानातील 17 सोन्याच्या चैन, नऊ सोन्याच्या अंगठ्या, मंगळसूत्र व इतर सोन्याचे दागिने असा सुमारे तीस लाख रुपये किमतीचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लांबविला. घटनास्थळी येरवडा पोलीस ठाण्यासह गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com