दागिने चोरून घराला आग लावून चोरटे पसार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fire

घरातून सोन्याचे दागिने आणि रोकड चोरी केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी घराला आग लावून चोरटे पसार झाले.

दागिने चोरून घराला आग लावून चोरटे पसार

पुणे - घरातून सोन्याचे दागिने (Gold Jewellery) आणि रोकड चोरी (Theft) केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी घराला आग (House Fire) लावून चोरटे पसार झाले. ही घटना महात्मा फुले पेठेतील रेसिडेन्सी प्रगती सोसायटीमध्ये नुकतीच घडली.

या संदर्भात अशोक भोई (वय ६९, रा. महात्मा फुले पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भोई हे २ मे ते ७ मे या कालावधीत कुटुंबासमवेत देवदर्शनासाठी बाहेरगावी गेले होते. यादरम्यान, चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून कपाटातून सोन्याचे दागिने आणि दीड लाखांची रोकड तसेच, मालमत्तेची कागदपत्रे चोरून नेली. चोरट्यांनी जाताना पुरावा नष्ट करण्यासाठी घराला आग लावून दिली. या आगीमध्येही घराचे नुकसान झाले. भोई हे देवशर्दनावरून आल्यानंतर खडक पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक राहुल जोग तपास करीत आहेत.

Web Title: Jewellery Theft And Thief Fire House Crime

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top