‘जीवनसाथी’ ॲपवरील ओळखीतून पावणेचार लाखांचा गंडा

‘जीवनसाथी’ ॲपवरील ओळखीतून पावणेचार लाखांचा गंडा
Published on

‘जीवनसाथी’ ॲपवर ओळख;
दागिने घेऊन तरुण पसार
सोलापुरातील महिलेला पावणेचार लाखांचा गंडा
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १४ : शहरातील ३७ वर्षीय महिलेसोबत ‘जीवनसाथी’ या मॅट्रिमोनी ॲपवरून बारामतीच्या तरुणाने ओळख केली. २८ ते ३१ मार्च दरम्यान तो तरुण सोलापुरात भेटायला आला. त्यावेळी महिलेने सोन्याची चेन व कानातील रिंग त्याने मागितली म्हणून दिली. तीन लाख ७० हजार रुपयांचे दागिने घेऊन तो तरुण जो गेला, तो परत आलाच नाही. या प्रकरणी त्या महिलेने १३ ऑगस्ट रोजी सदर बझार पोलिसांत धाव घेतली आहे. सिद्धार्थ देविदास झेंडे पाटील असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे.
फिर्यादी महिला व बारामतीचा सिद्धार्थ दोघेही २८ ते ३१ मार्च दरम्यान सोलापूर शहरातील मलबार गोल्ड शॉप येथे गेले. त्या ठिकाणी दागिने खरेदीच्या बहाण्याने सिद्धार्थने त्या महिलेस नेले होते. मात्र, त्याने फिर्यादीकडूनच ६.८७ ग्रॅमची सोन्याची चेन व १.२२ ग्रॅमची सोन्याची रिंग घेतली. नवीन दागिने घ्यायचे आहेत म्हणून सिद्धार्थने फिर्यादी महिलेचे दागिने स्वत:कडेच ठेवले. त्यानंतर तो कोठेतरी जाऊन येतो म्हणून गेला, तो परत आलाच नाही. त्याने पुन्हा संपर्क देखील केला नाही आणि दागिनेही परत केले नाहीत. त्याने विश्वास संपादन करून दागिने काढून घेऊन फसवणूक केल्याचेही फिर्यादीने पोलिसांना सांगितले. ती महिला सोलापुरातील वसुंधरा अपार्टमेंटमध्ये राहायला असून, त्यांच्या फिर्यादीवरून सिद्धार्थ झेंडे पाटील याचा शोध पोलिस घेत आहेत. गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक नवनाथ साखरे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com